(Source: ECI/ABP News/ABP Majha)
प्रियांका गांधींच्या ताफ्यात अपघात, रामपूरला जाताना दुर्घटना, जीवितहानी नाही
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर ही घटना घडली. प्रियांका गांधी रामपूरला ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या नवरीत सिंहच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना घडली.
लखनौ : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधीच्या ताफ्यात अपघात झाला आहे. उत्तर प्रदेशातील हापूड रोडवर ही घटना घडली. प्रियांका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्या. मात्र या घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. माहितीनुसार ताफ्यातील पुढच्या गाडीचालकाने अचानक ब्रेक लावला, त्यामुळं मागील गाड्या एकमेकांवर आदळल्या. ही घटना प्रियांका गांधी रामपूरला ट्रॅक्टर रॅलीत मृत्यू झालेल्या नवरीत सिंहच्या परिवाराला भेटण्यासाठी जात असताना घडली.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत जीव गमावलेल्या नवरीत सिंग यांच्या मृत्यूनंतर राजकारण चांगलचं तापल आहे. कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी नवरीत सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी रामपूरला जात आहेत. तसेच आज राष्ट्रीय लोक दलाचे नेते जयंत चौधरी देखील सिंग यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणार आहेत. आज नवरीत सिंग यांचा दहाव्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात प्रियांका गांधी सहभागी होणार आहेत. NH-24 मार्गाने त्या उत्तर प्रदेशातील रामपूर येथे जाणार आहे. त्यांच्यासह गाड्यांचा मोठा ताफा देखील आहे.
ट्रॅक्टर रॅलीनंतर पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये आयटीओजवळ पोलिस बॅरीकेड तोडण्याच्या प्रयत्नात असणारा एक भरधाव वेगाने येणारा ट्रॅक्टर पलटी झाला. या ट्रॅक्टरखाली दबून नवरीत सिंग यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात देखील सिंग यांच्या मृत्यूचे कारण अपघात सांगितलं आहे.
Delhi: Congress leader Priyanka Gandhi is en route to Rampur, Uttar Pradesh
Visuals from the Sahibabad area pic.twitter.com/eBlKixVH45 — ANI (@ANI) February 4, 2021
ट्रॅक्टर रॅली दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी अनेक अटींचं यावेळी उल्लघन केल्याचं सांगण्यात येतंय. शस्त्रे न बाळगता, निर्धारित मार्गाचा अवलंब करून आणि ट्रॉलीविना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करणे अशा काही अटींवर शेतकरी नेते आणि पोलीस यांच्यात सहमती झाली होती. मात्र ट्रॅक्टरच्या परेडमध्ये सहभागी असलेल्या अनेक निदर्शकांनी नियमांचं उल्लंघन केलं. पाच पेक्षा जास्त लोक ट्रॅक्टरवर बसणार नाहीत, या अटीचंही उल्लंघन आंदोलक शेतकऱ्यांनी केलं. त्यामुळे हा ट्रॅक्टर मार्च हिंसक झाला आणि यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक झाली होती.
संबंधित बातम्या :
ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास देशभरात 40 लाख ट्रॅक्टर्सची रॅली काढणार : राकेश टिकैत
#FarmerProtest कोणताही प्रोपगंडा देशातील ऐक्याला बाधा पोहोचवू शकत नाही, गृहमंत्री अमित शाहांचं ट्वीट