एक्स्प्लोर

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी तरुणांना दिली भेट, 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप;'नोकरी मिळवणे आता सोपे : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार (28 ऑक्टोबर) रोजी दिल्लीमधील रोजगार मेळाव्यात 51 हजार नियुक्ती पत्रांचे वाटप केले.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार (28 ऑक्टोबर) रोजी पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात 51 हजार नियुक्ती पत्रांचे केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'आता नोकरी मिळवणं हे अगदी सोपं झालं आहे. रोजगार मेळावा हा या महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन पोहचला आहे. मागील वर्षात ऑक्टोबर महिन्यात आपण या रोजगार मेळाव्याची सुरुवात केली. तेव्हापासून भाजप शासित राज्यामध्ये या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं.' 

आतापर्यंत लाखो तरुणांना सरकारी नोकरीसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. आजदेखील 50 हजार युवकांना सरकारी नोकरी देण्यात आली आहे. दिवळीसाठी अवघे काही दिवस राहिलेत. पण नियुक्ती पत्र वाटल्यानंतर या तरुणांच्या कुटुंबासाठी आजचा दिवस दिवळीपेक्षा काही कमी नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

भारतातील प्रत्येक क्षेत्रात रोजगार निर्माण 

देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित करण्यात आलेले रोजगार मेळावे हे तरुणांप्रती असलेल्या आमच्या बांधिलकीचा पुरावा आहेत. आमचे सरकार तरुणांचे भविष्य लक्षात घेऊन मिशन मोडमध्ये काम करत आहे. आम्ही केवळ रोजगारच देत नाही, तर संपूर्ण व्यवस्था पारदर्शक ठेवत आहोत. भारत ज्या दिशेने वाटचाल करत आहे आणि ज्या गतीने वाटचाल करत आहे, त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

धोर्डोबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान म्हणाले, 'गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील पाकिस्तानच्या सीमेवर असलेल्या धोर्डो गावाला यूएनने सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव म्हणून गौरविले आहे. यापूर्वी कर्नाटकातील होयसाळ मंदिरे आणि पश्चिम बंगालच्या शांतीनिकेतनला जागतिक वारसा स्थळाची मान्यता मिळाली आहे. यामुळे येथील पर्यटन आणि अर्थव्यवस्थेच्या विस्ताराची क्षमता किती वाढली असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. युवाशक्ती जितकी प्रबळ असेल तितका देशाचा विकास होईल. आज भारत आपल्या तरुणांना कौशल्य आणि शिक्षणाच्या नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहे.'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget