Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वेळ ठरली
2024 च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे.
![Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वेळ ठरली Press Conference by the Election Commission to announce the schedule for General Elections 2024 & some State Assemblies will be held at 3 pm tomorrow 16th March Election Commission : लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्याच जाहीर होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेची वेळ ठरली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/15/868846417ab281de99b05859e9f8a1251710486426993736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Election Commission to announce the schedule for General Elections 2024 : 2024 च्या लोकसभा निवडणुका (Loksabha Election 2024) आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. त्यामुळे उद्यापासून लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषद थेट प्रक्षेपित केले जाईल.
या घोषणेमुळे लोकसभा निवडणुकीचा राजकीय लढाईचा टप्पा निश्चित होईल. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार दुर्मिळ तिसरी टर्म जिंकण्याची आशा करत आहे, तर विरोधक इंडिया आघाडीच्या अंतर्गत एनडीएमध्ये धक्का देण्याची आशा करत आहेत. दरम्यान, आदर्श आचारसंहिता निवडणकू घोषणा झाल्यानंतर लगेचच लागू होते, ती सुद्धा उद्याच होणार आहे.
Press Conference by the Election Commission to announce the schedule for General Elections 2024 & some State Assemblies will be held at 3 pm tomorrow, 16th March. It will be live streamed on the social media platforms of the ECI: ECI pic.twitter.com/JVGGQfMYgw
— ANI (@ANI) March 15, 2024
यावेळी लोकसभेच्या निवडणुका 6 ते 7 टप्प्यात घेतल्या जातील असे मानले जात आहे. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिताही लागू होणार आहे.
2019 मध्ये 10 मार्च रोजी घोषणा
गेल्या वेळी 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकांची तारीख 10 मार्च रोजी जाहीर करण्यात आली होती. गेल्या वेळी 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान टप्प्याटप्प्याने लोकसभा निवडणुका झाल्या होत्या. गेल्या वेळी 67.1 टक्के मतदान झाले होते. तर 23 मे रोजी मतमोजणी झाली. यावेळी लोकसभा निवडणुकीत सुमारे 97 कोटी लोक मतदान करणार आहेत. यावेळी निवडणुकीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी अनेक नवी पावले उचलली जातील, असा दावा आयोगाने केला आहे.
2019 मधील लोकसभा निवडणूक निकालाचे परिणाम काय?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं 2014 च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. 2014 मध्ये भाजपनं 282 जागा जिंकल्या होत्या, तर 2019 मध्ये 303 जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या. भाजपला 37.7 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती, तर NDA ला 45 टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या होत्या.
राजकीय पक्षांनी प्रचारात मुलांचा वापर करू नये
दरम्यान, 5 फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात कोणत्याही स्वरुपात लहान मुलांचा वापर करू नये, असा सल्ला दिला आहे. पक्षांना पाठवलेल्या ॲडव्हायझरीमध्ये, निवडणूक पॅनलने पक्ष आणि उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पोस्टर्स आणि पॅम्प्लेट वाटणे आणि मुलांमध्ये घोषणाबाजी करणे याला खपवून घेतंल जाणार नाही, असा इशारा दिला आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी मतदार, 2 कोटी नवीन मतदार जोडले गेले
2024 च्या लोकसभा निवडणुकीत 97 कोटी लोक मतदान करू शकतील. 8 फेब्रुवारी रोजी, निवडणूक आयोगाने सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांच्या मतदारांशी संबंधित विशेष सारांश पुनरावृत्ती 2024 अहवाल प्रसिद्ध केला होता. आयोगाने सांगितले की, 18 ते 29 वयोगटातील 2 कोटी नवीन मतदार मतदानात सामील झाले आहेत. यादी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत 6 टक्के वाढ झाली आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले की, लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी जगातील सर्वाधिक म्हणजे 97 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. याशिवाय, लिंग गुणोत्तर देखील 2023 मध्ये 940 वरून 2024 मध्ये 948 पर्यंत वाढले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)