एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित? लवकरच होणार स्पष्ट

Presidential Election 2022 : लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा आज निकाल 21 जुलै रोजी म्हणजेच आज जाहीर करण्यात येणार आहे.

Presidential Election 2022 : भारताचा पुढील राष्ट्रपती कोण निवडला जाईल? या प्रश्नावरून आज पडदा उठणार आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. त्यामुळ लवकरच भारताला नवे राष्ट्रपती मिळतील. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल 21 जुलै रोजी म्हणजेच आज जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. 

आज राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 

18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीची मतमोजणी होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. संसद भवनात मतमोजणी होणार आहे. खोली क्रमांक 63 मध्ये मतमोजणी होणार आहे. त्याच कक्षात मतदानही झाले. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. 8 जुलैला भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत एकुण 4800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षा पाठिंबा होता. मुर्मू विजयी झाल्या, तर देशातील सर्वोच्च घटनात्मक पदावर पहिल्यांदा आदिवासी महिला विराजमान होतील. सकाळी 11 वाजता संसद भवनाच्या रूम नंबर 63 मध्ये मतमोजणी सुरू होणार आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजताच्या दरम्यान निकाल येण्याची शक्यता आहे.

अशा प्रकारे होणार मतमोजणी 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम संसद भवनात झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे. संसद भवनात एकूण 730 मतदान झाले. या मतमोजणीनंतर राज्यांमधील मतांची मोजणी सुरू होईल. त्यासाठी 10 राज्यांच्या मतपेट्या आलटून पालटून काढल्या जातील. उदाहरणार्थ, पहिल्या 10 राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांचा समावेश असेल.

द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित?
भाजपचे खासदार राजकुमार चहर म्हणाले की, आकडेवारी अनुकूल असल्याने एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे. विविध राज्यांतून द्रौपदी मुर्मूच्या बाजूने क्रॉस व्होटिंग झाल्याच्या बातम्या आल्याने विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांची शक्यता आणखी कमी झाली आहे. मुर्मू यांच्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणाऱ्या भाजपच्या सूत्रांचा दावा आहे की, मुर्मू यांना किमान 65 टक्के मते मिळतील, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची कारकीर्द संपणार असून येत्या 21 तारखेला देशामध्ये नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेला नाही. महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती.

यूपीमधून सर्वाधिक मते

यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील मतदार यादीत एकूण 4809 मतदार आहेत. यामध्ये 776 खासदार आणि 4033 आमदार आहेत. खासदारांच्या एका मताचे मूल्य 700 असते तर आमदारांच्या एका मताचे मूल्य राज्यानुसार बदलते. आमदारांच्या एका मताचे कमाल मूल्य उत्तर प्रदेशात 208 आहे, तर सर्वात कमी 7 हे सिक्कीममध्ये आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget