(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Presidential Election 2022 Live Updates : कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती, आज मतदान; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
Presidential Election 2022 : आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान होणार आहे. याचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. या संदर्भातील प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यानंतर 25 जुलै रोजा नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी होईल. संसदेत मतदानाच्या प्रक्रियेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. संसद भवनातील खोली क्रमांक 63 मध्ये मतदानासाठी 6 बूथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये एक बूथ दिव्यांग वोटरसाठी असेल. वेगवेगळ्या राज्यांचे नऊ आमदार संसद भवनामध्ये मतदान करतील, यामध्ये उत्तर प्रदेशमधील 4, त्रिपुरामधील 2, आसाममधील एक, ओडिशामधील एक आणि हरयाणातील एका आमदाराचा समावेश आहे. तर 42 खासदार विधानसभेत मतदान करतील.
एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. राजकीय बलाबल पाहता एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 2015 ते 2021 याकाळात झारखंडच्या राज्यपालांची जबाबदारी सांभाळली.
एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड
महिला, दलित, मुस्लीम आणि दक्षिण भारतातील व्यक्ती राष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत. पण आदिवासी समाज यापासून वंचित राहिला होता. त्यामुळे आदिवासी समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती होण्याचा बहुमान मिळावी अशी मागणी केली जात होती. द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्यास राष्ट्रपतीपदी विराजमान होणाऱ्या महिल्या आदिवासी महिला ठरतील.
यशवंत सिन्हा विरोधी पक्षाचे उमेदवार
यशवंत सिन्हा यांनी 24 वर्षे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. यादरम्यान त्यांनी बिहार सरकारच्या वित्त मंत्रालयात सचिव आणि उपसचिव म्हणून दोन वर्षे काम केले. यानंतर त्यांची भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयात उपसचिव पदावर नियुक्ती झाली. 1971 ते 1974 या काळात त्यांची जर्मनीतील भारतीय दूतावासाचे प्रथम सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
Presidential Election 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत क्रॉस मतदान; काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीएला मतदान
Presidential Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्षाच्या आमदारांकडून एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान झाल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे शहजील इस्लाम, राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार एस. जडेजा, ओदिशामध्ये काँग्रेस आमदार मोहम्मद मुकीम यांनी मुर्मू यांना मतदान केले.
Presidential Election 2022 : महाराष्ट्रात शिंदे गटातील 48 आमदारांनी बजावला राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाचा हक्क
Presidential Election 2022 : महाराष्ट्रात शिंदे गटातील 48 आमदारांनी बजावला राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानाचा हक्क
Presidential Election 2022: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी बजावला मतदानाचा अधिकार
Presidential Election 2022: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मतदानाचा अधिकार बजावला. डॉ. मनमोहन सिंह हे प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव व्हिलचेअरवरून संसदेत दाखल झाले आणि मतदानाचा अधिकार बजावला.
Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? कुणाचं पारडं जड? असं आहे मतांचं गणित
Presidential Election 2022 LIVE : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरलेले यशवंत सिन्हा? क्लिक करा आणि जाणून घ्या मतांचं गणित कसं आहे...
Presidential Election 2022: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बजावला मतदानाचा हक्क
Presidential Election 2022: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत राष्ट्रपती निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला आहे.