एक्स्प्लोर

India : दोन राज्यांचे राज्यपाल बदलले, रघुवर दास ओडिशाचे आणि इंद्रसेना रेड्डी त्रिपुराचे नवे राज्यपाल

Governor Of Odisha and Tripura : तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांची ओडिशाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

India News : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी ओदिशा (Odisha) आणि त्रिपुरा (Tripura) या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे. तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डी नल्लू (Indra Sena Reddy) यांची त्रिपुराचे राज्यपाल (Governor Of Tripura) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास (Raghubar Das) यांना ओदिशाचे राज्यपाल (Governor Of Odisha) बनवण्यात आलं आहे. राष्ट्रपती भवनाने बुधवारी, 18 ऑक्टोबर रोजी एक निवेदन जारी करून या दोन राज्यांसाठी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती दिली आहे. 

दोन्ही राज्यांच्या नव्या राज्यपालांबद्दल जाणून घ्या.

रघुवर दास ओदिशाचे नवे राज्यपाल (Raghubar Das New Governor Of Odisha)

रघुवर दास (Raghubar Das) सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद सांभाळत आहेत. रघुवर दास यांनी 2014 ते 2019 पर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला होता. 1995 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले रघुवर दास हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिले मुख्यमंत्री होते. रघुवर दास हे ओडिशाचे विद्यमान राज्यपाल गणेश लाल यांची जागा घेतील. लाल यांना 2018 मध्ये ओडिशाचे राज्यपाल बनवण्यात आले होते.

इंद्र सेना रेड्डी त्रिपुराचे नवे राज्यपाल (Indra Sena Reddy Nallu New Governor Of Tripura)

तेलंगणातील भाजप नेते आणि सध्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव इंद्र सेना रेड्डी नल्लू यांनाही त्रिपुराच्या राज्यपाल पदाची महत्त्वाच्या पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. इंद्र सेना रेड्डी नल्लू हे त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची जागा घेतील. आर्य यांना जुलै 2021 मध्ये राज्याचे राज्यपाल बनवण्यात आले होते.

राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला आनंद

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्रिपुरा आणि ओडिशामध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल त्यांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केल्याचे राष्ट्रपती भवनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. रघुवर दास आणि इंद्र सेना रेड्डी नल्लू यांच्या नियुक्त्या त्यांनी त्यांच्या संबंधित कार्यालयाचा कार्यभार स्वीकारल्यापासून प्रभावी होतील.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget