एक्स्प्लोर

Pravasi Bharatiya Divas 2022: आज प्रवासी भारतीय दिन, काय आहे हा दिवस आणि महात्मा गांधीजींचं कनेक्शन?

Pravasi Bharatiya Divas 2022: अनिवासी भारतीयांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रवासी भारतीय दिनाचे हे व्यासपीठ महत्वाचे आहे. 

नवी दिल्ली: मूळचे भारतीय पण सध्या परदेशात राहत असलेल्या नागरिकांचे देशाच्या विकासात योगदानाचे महत्व लक्षात घेऊन तसेच त्यांची मातृभूमीशी नाळ कायमची जोडली जावी या उद्देशाने भारतात 9 जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ताने उल्लेखनीय काम केलेल्या अनिवासी भारतीयांना प्रतिष्ठेचा 'प्रवासी भारतीय पुरस्कार' देण्यात येतो. अनिवासी भारतीयांच्या संबंधित वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यासाठी प्रवासी भारतीय दिनाचे हे व्यासपीठ महत्वाचे आहे. 

गांधीजींचं भारतात आगमन 

मोहनदास करमचंद गांधी हे 1883 सालाच्या सुमारास एका खटल्यासंबंधी दक्षिण आफ्रिकेला गेले होते. त्या ठिकाणी कृष्णवर्णीय लोकांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाचा अवलंब केला आणि कृष्णवर्णीयांना त्यांचे अधिकार मिळवून दिले. त्यानंतर 9 जानेवारी 1915 साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.

भारतातील या सर्वात मोठ्या प्रवाशाच्या आगमनानिमित्त 2003 सालापासून प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस प्रत्येक वर्षी साजरा केला जायचा पण 2015 सालापासून प्रत्येक दोन वर्षांनी हा दिवस साजरा केला जातोय. 

कोण आहेत प्रवासी भारतीय? 

मूळचे भारतीय वंशाचे पण सध्या जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहत असलेल्या नागरिकांना प्रवासी भारतीय म्हटलं जातं. सरकारच्या एका अहवालाच्या मते, जगभरातील 110 देशांमध्ये जवळपास अडीच कोटी मूळ भारतीय वंशाचे नागरिक वास्तव करत आहेत. या लोकांनी विदेशात राहूनही आपल्या देशाची संस्कृती, भाषा, वारसा अशा अनेक गोष्टींची जपणूक केली आहे. या नागरिकांमुळेच जगभरात भारताला एक वेगळी ओळख मिळतेय.

देशाच्या विकासात योगदान जगभरात राहणाऱ्या प्रवासी भारतीयांचे भारताच्या विकासात मोठं योगदान आहे. जागतिक बँकेचा मायग्रेशन अॅन्ड रेमिटन्स (MIGRATION AND REMITTANCE) नावाचा एक अहवाल असं सांगतोय की आपल्या मुळच्या देशात पैसे पाठवण्याच्या बाबतीत अनिवासी भारतीयांचा जगात क्रमाक पहिला लागतोय. याच अहवालात असं सांगण्यात आलंय की 2019 साली अनिवासी भारतीयांनी देशात 83.1 अब्ज डॉलर भारतात पाठवले आहेत. भारतानंतर चीनच्या नागरिकांचा दुसरा क्रमांक लागतोय.

आखाती देशात राहतात सर्वात जास्त अनिवासी भारतीय 

भारतातून कामासाठी देशाबाहेर गेलेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आखाती देशांत आहे. भारत सरकारच्या एका अहवालानुसार जवळपास 30 लाख अनिवासी भारतीय आखाती देशात काम करत आहेत. याच प्रदेशातून भारतात सर्वाधिक पैसे पाठवले जातात. त्यानंतर ब्रिटनमध्ये 10 लाख अनिवासी भारतीय तर कॅनडामध्ये अडीच लाख अनिवासी भारतीय लोक वास्तवास आहेत. आतापर्यंत जवळपास 60 देशांतील 240 अनिवासी भारतीयांना प्रवासी भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यातDhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
बीडची बदनामी आम्ही नव्हे तुमच्या वाल्मिक कराडने केली; तुम्ही आता राजीनाम्याची तयारी करा; अंजली दमानियांनी धनंजय मुंडेंना सुनावले खडेबोल
Praful Patel NCP Shirdi Shibir: लोकसभेचा निकाल बघून अजितदादा अन् मी एकमेकांचा चेहराच पाहत बसलो होतो, प्रफुल पटेलांनी सांगितला 'तो' किस्सा
लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा अन् मी एकमेकांचे चेहरे पाहत होतो, पण खचायचं नाही हे ठरवलं: प्रफुल पटेल
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Jalgaon Crime: धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
धक्कादायक! रात्रीचा वाद पुन्हा उफाळला,टोळक्यानं कोयते तलवारी उपसल्या, बापासमोरच मुलाला संपवलं
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
Embed widget