एक्स्प्लोर
Advertisement
'रोमिओ नव्हे तर श्रीकृष्ण महिलांची छेड काढत असे'
नवी दिल्ली : प्रसिद्ध वकील आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते यांनी उत्तर प्रदेश सरकारने सुरु केलेल्या अॅन्टी रोमिओ स्क्वॉडवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. विशेष म्हणजे, प्रशांत भूषण यांनी रोमियोची तुलना थेट पुराणातल्या श्रीकृष्णाशी केली आहे.
प्रशांत किशोर यांनी अॅन्टी रोमिओ स्क्वॉडसंदर्भात ट्वीट करुन टीका केली असून, या ट्वीटमध्ये भूषण यांनी, ''रोमिओने आपल्या आयुष्यात केवळ एकाच मुलीवर प्रेम केलं. मात्र, पुराणकाळात श्रीकृष्णाने अनेक तरुणींची छेड काढली होती. तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी अॅन्टी रोमिओ स्क्वॉडचं नामकरण अॅन्टी श्रीकृष्ण स्क्वॉड असं करुन दाखवावं,'' असं म्हणत योगी आदित्यनाथ यांना आव्हान दिलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या अॅन्टी रोमिओ स्क्वॉडवरुन यापूर्वीही अनेकांनी टीका केली आहे. टीकाकारांच्या मते, रोमिओ ही शेक्सपिअरच्या नाटकातील प्रसिद्ध व्यक्तीरेखा आहे. शेक्सपिअरच्या रोमिओ-ज्यूलिअट या नाटकात प्रेम आणि समर्पणाची भावना दाखवण्यात आली होती. त्या अनुषंगाने प्रशांत भूषण यांच्या या ट्वीटवरुन नवीन वाद उद्धभवण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर, महिला छेडछाडीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी अॅन्टी रोमिओ स्क्वॉडची स्थापना केली. भाजपने याचा उल्लेख आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातही केला होता. योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेलं हे पथक महिला छेडछाडीचे प्रकार थांबवण्यासोबतच 'लव जिहाद'च्या प्रकारांनाही आळा घालेल असं, यावेळी सांगितलं जात आहे. त्यामुळे याच्या नावावरुन आता वाद सुरु होण्याची चिन्हं आहेत. दरम्यान, अॅन्टी रोमिओ स्क्वॉडच्या स्थापनेनंतर तरुण-तरुणींशी गैरवर्तणुकीच्या तक्रारीही समोर येत आहेत. गाझियाबादच्या एका पार्कमध्ये बसलेली तरुणी आणि तिच्या मित्राला पोलीसांनी धमकावलं आणि अँटी रोमिओ पथकाच्या नावाने गैरवर्तन करुन दोघांनाही पोलीस व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवलं. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं. संबंधित बातम्याRomeo loved just one lady,while Krishna was a legendary Eve teaser.Would Adityanath have the guts to call his vigilantes AntiKrishna squads? https://t.co/IYslpP0ECv
— Prashant Bhushan (@pbhushan1) April 2, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement