एक्स्प्लोर

PM Suraksha Bima Yojana :  दर महिन्याला एक रुपया गुंतवा आणि दोन लाखांचा विमा घ्या, 'असं' करा रजिस्ट्रेशन

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: दर महिन्याला एक रुपया म्हणजे वर्षाला 12 रुपये गुंतवल्यास आपल्याला दोन लाखांच्या विमा सुरक्षेचा लाभ मिळू शकतो. 

नवी दिल्ली : देशातल्या गरीब कुटुंबांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी केंद्र सरकारने एक पाऊल उचललं आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत आता दर महिन्याला केवळ एक रुपया भरावा लागणार आहेत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला दोन लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच मिळणार आहे. 

आजच्या धकाधकीच्या आयुष्यात विमा ही केवळ गुंतवणूक नव्हे तर अत्यंत आवश्यक बाब बनली आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळू शकते. उच्च मध्यम वर्गातील बहुतांशी लोक आपला विमा उतरवतात पण गरीब लोकांना याचे प्रिमियम भरायला परवडत नसल्याने ते याकडे वळत नाहीत. त्यामुळे गरीब कुटुंबांच्या सामाजिक सुरक्षेसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या (PMSBY) अंतर्गत वर्षाला 12 रुपये भरावे लागणार असून त्यामुळे दोन लाखांचा अपघात विमा सुरक्षा मिळणार आहे. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वर्षाला एकदाच हा 12 रुपयाचा प्रिमियम भरावा लागणार असून ते आपल्या बँकेच्या अकाऊंटमधून आपोआप कट होणार आहेत. 

या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केल्यास दर वर्षाच्या 31 मे पूर्वी आपल्या अकाऊंटमधून 12 रुपये कट होणार आहेत आणि आपल्याला 1 जून ते 31 मे या कालावधीच्या दरम्यान विम्याची सुरक्षा मिळणार आहे. या योजनेनुसार, व्यक्तीचा अपघात झाल्यास किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचा अपघाती विमा मिळेत तर जखमी झाल्यास किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास त्याला एक लाख रुपयाचा विमा मिळणार आहे.  या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपल्या बँकेच्या अकाऊंटमध्ये बॅलेन्स असणं आवश्यक आहे. बँक खाते बंद झाल्यास पॉलिसी बंद पडते.  

कसं करायचं रजिस्ट्रेशन? 
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला आपल्या जवळच्या बँकेत जावं लागेल आणि तसा अर्ज करावा लागेल. यासाठी आपण बँक मित्रांचीही मदत घेऊ शकता. केंद्र सरकार सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या सहकार्यांने ही योजना राबवत आहे. 

कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होणार याचा लाभ? 
पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा (PMSBY) लाभ 18 ते 70 वयोगटातील लोकांना होणार आहे. जर एखाद्याचे वय 70 वर्षाच्या वरती असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Vs Sanjay Shirsat : Eknath Shinde यांच्या बॅगेत नेमकं काय? राऊत - शिरसाटांमध्ये खडाजंगी!Shrirang Barne on Maval Lok Sabha Elections : मावळमध्ये फेर मतदान होणार?श्रीरंग बारणेंची मोठी मागणी!Ghatkopar Hoarding Video : मुंबई होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू, अजूनही 30 जण अडकल्याची भीती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
GT vs KKR Rain : अहमदाबादमध्ये पावसाचा खेळ, चेन्नई-गुजरात सामन्यात व्यत्यय 
Loksabha Election : देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
देशात चौथ्या टप्प्यात पाचपर्यंत 62.56 टक्के मतदान; बंगालमध्ये सर्वाधिक, महाराष्ट्रात किती?
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
राजस्थानला मोठा धक्का, मोक्याच्या क्षणी स्टार प्लेअरची आयपीएलमधून माघार! 
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
मुंबईतील महाकाय बॅनर दुर्घटनेत 3 ठार, 59 जणांना बाहेर काढलं; अद्यापही 38 जण अडकले
Embed widget