एक्स्प्लोर

Digital Currency : भारतात लवकरच 'डिजिटल करन्सी' वास्तवात येणार; RBI ची तयारी सुरु

देशातील डिजिटल पेमेंटच्या व्यवहारात झालेली वाढ लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची शक्यता आहे. 

मुंबई : भारतात डिजिटल करन्सी लागू करण्याकडे एक पाऊल पडत असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून देशात डिजिटल करन्सी सुरु करण्याच्या तयारीत आहे. देशभरात टप्प्याटप्प्याने डिजिटल करन्सी लागू करण्यात येणार आहे. जगभरात अनेक देशांमध्ये डिजिटल करन्सी लागू करण्याचा विचार सुरु आहे. भारतातही डिजिटल करन्सी लागू करण्याची गरज असल्याचं मत आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी. शंकर यांनी गेल्या आठवड्यात व्यक्त केलं होतं.

भारतात सुरु होणारी डिजिटल करन्सी ही क्रिप्टोकरन्सी बिटकॉईनसारखीच असणार आहे. पण बिटकॉईनपेक्षाही त्यामध्ये अधिक पारदर्शकता असेल आणि ती कायदेशीर असेल. आरबीआयचे यावर काम सुरु असून लवकरच याबद्दलचे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे.  

फेब्रुवारी महिन्यामध्ये डिजिटल करन्सीवर भाष्य करताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, "सेंट्रल बॅंक डिजिटल करन्सी (CBDC) च्या माध्यमातून देशात क्रिप्टोकरन्सीचा  वापर करता येतो का याची चाचपणी सुरु आहे. डिजिटल क्रांतीमध्ये भारत कुठेही मागे राहता कामा नये यासाठी हे पाऊल उचललं जात आहे."

डिजिटल करन्सीचा वापर करुन आपण मोबाईल किंवा लॅपटॉपवरुन आपल्या पैशाचा व्यवहार करु शकतो. यामध्ये तिसऱ्या व्यक्ती किंवा मध्यस्ताची गरज नसते. गेल्या एक-दोन वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट अॅपमुळे भारतातील हार्ड कॅश व्यवहार हे बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत. या पेमेंट अॅपपेक्षाही अधिक सुलभता या डिजिटल करन्सीमुळे येण्याची शक्यता आहे. 

भारतात अद्याप क्रिप्टोकरन्सीच्या वापराला मान्यता नाही. आरबीआय आणि सेबी यांसारख्या नियामक मंडळांकडे क्रिप्टोकरन्सीच्या वापराबाबत निश्चित असे नियम नाहीत. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापरावर थेट नियंत्रण ठेवता येत नाही. या आधी आरबीआयने बिटकॉइनसारख्या व्हर्च्युअल करन्सीच्या वापरावर 2018 साली बंदी घातली होती. ती बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली होती.

महत्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

M K Madhvi Arrested : राजन विचारेंचे निष्ठावंत कार्यकर्ता एम.के.मढवी  पोलिसांकडून अटक !Ajit Pawar On Dharan : धरणाच्या वाक्यामुळे माझं वाटोळं झालं,पहिल्यांदाच संपूर्ण किस्सा सांगितलाJayant Patil on Shashikant Shinde : शशिकांत शिंदे चारपट मतांनी विजयी होतील- जयंत पाटीलLok Sabha Election 2024 : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींच्या सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MP Prajwal Revanna : शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
शेकडो महिलांवर अत्याचार अन् हजारो व्हिडिओ व्हायरल; माजी पीएम देवेगौडांच्या नातवाच्या सेक्स स्कॅंडलने खळबळ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास आहे की नाही? निलेश लंकेंच्या प्रचारसभेतून शरद पवारांनी डागली तोफ
Yavatmal News : लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
लग्नाचा स्वागत समारंभ आटोपून परतताना बस-ट्रकचा भीषण अपघात; चार ठार, सहा जखमी
M K Madhavi in Police Custody :  ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
ठाकरे गटाला धक्के सुरुच, एम के मढवी अडचणीत वाढ, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, मुंबई इंडियन्सच्या ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, दिल्लीकडून जोरदार धुलाई
PSL गाजवणारा हिरो IPL मध्ये झिरो, ल्यूक वूडच्या नावावर नकोसा विक्रम, मुंबई इंडियन्सच्या महागडच्या बॉलर्सच्या यादीत टॉपवर 
Mumbai Crime : बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री, एका डाॅक्टरसह 7 जण गजाआड
बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; तब्बल 14 बालकांची विक्री
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तानाजी सावंतांचा ओमराजे निंबाळकरांवर पुन्हा घणाघात
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
'सहानुभूतीसाठीच काहींकडून कट कारस्थान', प्रकाश शेंडगेंच्या आरोपावर मनोज जरांगेंचे चोख प्रत्युत्तर
Embed widget