(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nisar Satellite : 2024 च्या सुरुवातीला लाँच होणार निसार सॅटेलाईट, नासा आणि इस्रोचं संयुक्त मिशन
Nisar Satellite will Launch in 2024 : भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त अंतराळ मोहिमेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 2024 च्या सुरुवातीला निसार उपग्रह प्रक्षेपित करण्यात येईल.
ISRO NASA Space Mission 2024 : भारत (India) आणि अमेरिका (America) आगामी अंतराळ मोहिमेसाठी सज्ज (Space Mission) आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था यांच्या संयुक्त अंतराळ मोहिम असलेल्या निसार सॅटेलाइटबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निसार उपग्रहाचे दोन महत्त्वाचे भाग एकत्र जोडण्यात आले आहेत. निसार उपग्रह 2024 च्या सुरुवातीला लाँच करण्यात येणार आहे. भारत आणि अमेरिका यांनी एकत्र मिळून नासा-इस्रो सिंथेटिक अपर्चर रडार (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) अर्थात निसार (NISAR) उपग्रह तयार केला आहे. इस्रो आणि नासाचं हे संयुक्त अभियान भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीचं आणखी एक उदाहरण आहे.
भारत आणि अमेरिकेच्या संयुक्त अंतराळ मोहिम
पहिल्या टप्प्यामध्ये इस्रोने निसार उपग्रह तयार करण्याचं काम केलं आणि मार्च 2023 मध्ये हा उपग्रह भारताकडे सोपवला. त्यानंतर बंगळुरुमध्ये निसार उपग्रह पुढे विकसित करण्याचं काम इस्रोकडून सुरु आहे. पृथ्वीच्या जमिनीच्या आणि बर्फाच्या पृष्ठभागाच्या हालचालींचा अत्यंत बारकाईने मागोवा घेण्यासाठी NASA आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कडून संयुक्तपणे निसार उपग्रह विकसित केला जात आहे. निसार सॅटेलाइट पृथ्वीच्या प्रत्येक भागावर दर 12 दिवसांनी किमान एकदा निरीक्षण करेल. यामुळे पृथ्वीच्या हवामानाचं सखोल इतर निरीक्षण करण्यासोबतच येथील जमीन, जंगलं, पाणथळ प्रदेश आणि शेतजमिनींची गतिशीलता देखील समजून घेण्यास मदत होणार आहे.
नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार
निसार उपग्रहामुळे जगाला नैसर्गिक आपत्तींची आगाऊ माहिती मिळणार आहे. कृषी क्षेत्रातही हा उपग्रह महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. निसार उपग्रह (NISAR Satellite) हा उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागाचं संपूर्ण विश्लेषण करून माहिती गोळा करेल. याचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन प्रवण क्षेत्र शोधणे तसेच कृषी क्षेत्र यासारख्या विविध कारणांसाठी केला जाईल. 2024 च्या सुरुवातीला निसार उपग्रहाचं प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून निसार सॅटेलाइट अवकाशात झेपावेल.
पृथ्वीवरील वातावरणाची माहिती गोळा करणार
या सॅटेलाइटच्या रडार इन्स्ट्रुमेंट पेलोडमध्ये दोन रडार प्रणाली आहेत. एस-बँड रडार पीक रचना, जमीन आणि बर्फाच्छादित पृष्ठभागाचं निरीक्षण करण्यासाठी मदत करेल. तर एल-बँड रडार इतर निरीक्षणाबरोबरच झाडांच्या वृक्षाच्छादित जमिनीचा अभ्यास करुन तेथील माहिती गोळा करेल. एस-बँड सिग्नलची लांबी सुमारे 4 इंच (10 सेंटीमीटर) आणि एल-बँडच्या सिग्नलची 10 इंच (25 सेंटीमीटर) आहेत आणि दोन्ही सेन्सर ढगांमधून स्पष्टपणे पाहू शकतात आणि दिवस-रात्र माहिती गोळा करू शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :