एक्स्प्लोर

Chandrayaan-3 : 'या' दिवशी चंद्रावर उतरणार चांद्रयान-3, इस्रोच्या चंद्र मोहिमेचा खर्च किती? सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या...

ISRO Moon Mission : चांद्रयान 3 चंद्रावर कधी उतरणार? चंद्र मोहिमेचा खर्च किती? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर वाचा सविस्तर...

ISRO Chandrayaan 3 Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बहुप्रतीक्षित चंद्र मोहीम चांद्रयान-3 (Chandrayaan-3) साठी सज्ज झाली आहे. चार वर्षांनंतर इस्रो पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे. चार वर्षांपूर्वा हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.

पहिल्यांदाच चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार अंतराळयान

चांद्रयान 3 हे चांद्रयान 2 चा पुढचा टप्पा आहे. सप्टेंबर 2019 मध्ये चांद्रयान 2 प्रक्षेपित करण्यात आलं होतं. पण, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात अयशस्वी ठरलं. चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झालं. त्यामुळे आता इस्रो चार वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्र मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. इस्रोचे लॉन्च व्हेईकल मार्क-3 (LVM3) नावाचे तीन-स्टेज रॉकेट चांद्रयान-3 अंतराळयानासह रोबोटिक मून लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षामध्ये घेऊन जाईल. यानंतर चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल.

चांद्रयान-3 च्या लँडर आणि रोव्हरचं नाव

चांद्रयान 3 सोबत यावेळी फक्त लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. यामध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. तर, चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरची मदत घेतली जाईल. चांद्रयान-3 अंतराळ यानामध्ये विक्रम (Vikram Lander) नावाचा लँडर आहे. विक्रम लँडर हवामानाची माहिती गोळा करण्यासाठीच्या महत्त्वाच्या उपकरणांनी सुसज्ज आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर विक्रम लँडरचं काम संपेल आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील माहिती गोळ करण्याचं काम करेल.

चांद्रयान-3 मोहिमेचा खर्च किती?

चांद्रयान-3 चं एकूण वजन 3900 किलो आहे. या मोहिमेसाठी सुमारे 615 कोटी रुपये खर्च आला आहे. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरचा वापर केल्याने चांद्रयान-3 चा खर्च तुलनेने कमी झाला आहे. चांद्रयान 2 मोहिमेसाठी 960 कोटी रुपये तर चांद्रयान-1 साठी 386 कोटी रुपये खर्च आला होता.

चांद्रयान 3 चंद्रावर कधी उतरणार?

इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 अंतराळयान 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल. दरम्यान, परिस्थितीनुसार वेळ बदलू शकते. 

चांद्रयान-3 चा मुख्य उद्दिष्ट

चांद्रयान 3 चा मुख्य उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून तेथील पृष्ठभागाचं रासायनिक विश्लेषण करणं आहे आहे. या भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञान शोधण्यास मदत होईल.

इस्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम आणि खर्च

चांद्रयान -1 : 22 ऑक्टोबर 2008 (386 कोटी खर्च)

चांद्रयान -2 : 22 जुलै 2019 (960 कोटी खर्च)

चांद्रयान -3 : 14 जुलै 2023 (615 कोटी खर्च)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Chandrayaan 3 : इस्रो तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी सज्ज! शास्त्रज्ञांची टीम तिरुपतीच्या दर्शनाला, चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget