एक्स्प्लोर

Poonch Terrorist Attack: काश्मीरमधील पुंछमध्ये साजरी नाही होणार 'ईद', शहीद जवानांना गावकऱ्यांकडून श्रद्धांजली ...

Poonch Terror Attack:  पुंछमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्यामुळे तेथील गावकऱ्यांनी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.  

Poonch Terror Attack:   जम्मू - काश्मीरमधील पुंछ(poonch) येथे गुरूवारी 20 एप्रिल रोजी जवानांच्या ट्रकवर दहशतवादी हल्ला(terror attack) झाला. या हल्यात पाच भारतीय जवान(indian army) शहीद झाले. ज्या ट्रकमध्ये  इफ्तारचे सामान होते, अशी माहिती आता समोर येत आहे. त्यादिवशी एका गावात इफ्तार पार्टीचे (iftar) आयोजन करण्यात आले होते, त्याचेच सामान या ट्रकमध्ये होते. 

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी 20 एप्रिलला संध्याकाळी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. परंतु दहशतवाद्यांचा या इफ्तार पार्टीला विरोध होता.  भारतीय लष्करी जवान जम्मू - काश्मीर मधील विविध भागात अशा इफ्तार पार्टीचे आयोजन करतात. याच आयोजनावर नाराज होऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला असल्याचे वृत्त मिळत आहे. 

ईद साजरी न करण्याचा गावकऱ्यांचा निर्णय...

भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत गावकऱ्यांनी ईद(Eid) साजरी न करण्याचा निर्णय घेतलाय. खरंतर भारतीय जवानांना येथील लोकं आपलसं तर  करून घेणार नाहीत अशी भीती दहशतवाद्यांना आहे.. जर असे झाले तर त्यांना भारतीय जवानांविरोधात येथील लोकांना भडकवता येणार नाही.  म्हणूनच भारतीय जवानांची येथील लोकांशी होणारी जवळीक दहशतवाद्यांना मान्य नाही. जवानांशी सलगी करणाऱ्या लोकांकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जाते. जवनांना आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीची माहिती मिळताच हा हल्ल्याचा कट रचला. जेव्हा जवान इफ्तारचे सामान घेऊन ट्रक जात होता, तेव्हाच हा हल्ला करण्यात आला. पहिल्यांदा गोळीबार करण्यात आला नंतर ग्रेनेडने हल्ला करण्यात आला. 

पाच जवान झाले शहीद

या हल्ल्यात राष्ट्रीय राइफल्स(आरआर)चे  हवालदार मनदीप सिंह, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह हे जवान शहीद झाले. एक जवान गंभीर जखमी असून, लष्कराच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हल्यानंतर त्या संपूर्ण परिसरात शोध मोहिम सुरू केली,त्यासीठी ड्रोनचा देखील वापर केला जात आहे. 
 या हल्ल्याची जबाबदारी पीएफएफ नावाच्या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. पीएफएफ ही पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. 

ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचं समजतं. हल्ल्यानंतर गाडीच्या इंधन टाकीला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन आगीत जळून खाक झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा जवान वाहनातून काही सामान घेऊन जात होते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या 

Poonch Terror Attack : पुंछ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं भारतीय लष्कराकडून जाहीर

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; आजपासून सुरुवात
Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
Delhi CISF Jawan News: CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?
CISF जवान मेट्रोत चढला, लपून फोटो काढत बसला; महिलेने बघताच राडा; मोबाईलच्या गॅलरीमध्ये सगळं दिसलं, पुढे काय घडलं?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
Embed widget