एक्स्प्लोर

Poonch Terror Attack : पुंछ दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची नावं भारतीय लष्कराकडून जाहीर

Poonch Terror Attack : भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत.

Poonch Terror Attack : भारतीय लष्कराने (Indian Army) जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये (Poonch) गुरुवारी (20 एप्रिल) ट्रकवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) शहीद झालेल्या पाच जवानांची नावे जाहीर केली आहेत. हवालदार मनदीप सिंह, लान्स नायक देबाशिष बसवाल, लान्स नायक कुलवंत सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह अशी मृत जवानांची नावे आहेत, असं नागरोटा इथल्या लष्कराच्या 16 कॉर्प्सने सांगितलं.

"व्हाईट नाईट कॉर्प्स शहीद जवानांच्या शोकाकुल कुटुंबांसोबत एकजुटीने उभे आहे," असं ट्विटरवर म्हटलं आहे.

शहीद झालेले जवान भारतीय लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे होते. या भागात दहशतवादविरोधी कारवायांसाठी ते तैनात होते.

पाच जवान शहीद

जम्मूमधील राजौरी सेक्टरमध्ये जात असताना पुंछ जिल्ह्यात जवानांच्या ट्रकला आग लागली. यामध्ये पाच जवान शहीद झाले आहेत तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर सैन्याच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भारतीय लष्कराने हा दहशतवादी असल्याचं म्हटलं आहे. दहशतवादी संघटना जैश समर्थित PAFF म्हणजेच पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत दहशतवादी हल्ला

लष्कराकडून सांगण्यात आलं की, "गुरुवारी दुपारी तीन वाजता राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पुंछ दरम्यान महामार्गावरुन जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागली असावी." "हल्लेखोरांनी मुसळधार पाऊस आणि परिसरातील कमी दृश्यमानतेचा फायदा घेतला," असं लष्कराने निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आणि एक जवान जखमी झाला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन सुरु केलं असून अद्याप त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी असल्याचं समजतं. हल्ल्यानंतर गाडीच्या इंधन टाकीला आग लागली आणि काही वेळातच संपूर्ण वाहन आगीत जळून खाक झालं. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हल्ला झाला तेव्हा जवान वाहनातून काही सामान घेऊन जात होते. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेपूर्वी हा नियोजित हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.

संबंधित बातमी

Army Truck Caught Fire: काश्मीर: लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; 5 जवान शहीद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Murlidhar Mohol On Delhi Assembly Election : मागच्या 10 वर्षातील खोटं बोलणाऱ्या सरकारचा अंत : मोहोळSuperfast News | दिल्ली विधानसभा | Delhi Assembly Election | दिल्लीतही कमळ | ABP MajhaDevendra Fadnavis On Arvind Kejriwalकेजरीवालांचा बुरखा दिल्लीकरांनी फाडला,देवेंद्र फडणवीस यांचा टोलाAnna Hazare on Delhi Election : दिल्लीच्या निकालावर अण्णा हजारे ढसाढसा रडले : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget