एक्स्प्लोर

Kanpur Encounter | युपीत गुंडांच्या हल्ल्यात आठ पोलीस कर्मचारी शहीद होण्याच्या घटनेत पोलिसांची चूक : प्रशांत कुमार

उत्तर प्रदेश मधील कानपूरमध्ये चित्रपटाचं कथानक शोभावं अशी एक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गुंडांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. या घटनेला पोलीस जबाबदार असल्याचं एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी म्हटलं आहे.

कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये चित्रपटासारखी घटना घडली आहे. गुंडाना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या टीमवर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आठ पोलीस कर्मचारी शहिद झाले आहेत. सात जण जखमी झाले आहेत. शहिदांमध्ये एक डीवायएसपी, तीन सब इन्सपेक्टर आणि चार चार हवालदारांचा समावेश आहे. पोलिसांना कुख्यात गुन्हेगार विकास दुबे एका गावात लपला असल्याची माहिती मिळाली होती. ह्या दुबेला पकडण्यासाठी गेलेल्या टिमवर हल्ला झाला. दरम्यान, कानपुर. घटनास्थळी पोहचलेले एडीजी लॉ अँड ऑर्डर प्रशांत कुमार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणाला पोलिसांची चूक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. या सर्व घटनेचा रिपोर्ट प्रशांत कुमार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवणार आहे.

पोलिसांची टीप कुणीतरी गुन्हेगारांना दिली असल्याची शक्यता आहे. याची चौकशी होणार आहे. कुख्यात गुन्हेगार विकास दुबे देखील हल्ला करू शकतो? याची पोलिसांना माहिती नव्हती का? विकास दुबेकडे एके 47 सारखी आधुनिक हत्यार होते. आपले पोलीस यासाठी तयार होते का? या सर्वाची चौकशी होणार असल्याचे प्रशांता कुमार यांनी सांगितले.

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपींसह आठ पोलीस शहीद

काय आहे घटना?

कुख्यात गुन्हेगार विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांची 40 जणांची टीम गावात पोहचली. त्यानंतर जे घडलं ते फक्त चित्रपटात शोभून दिसलं असतं. हे दशकभरापुर्वी उत्तर प्रदेश-बिहर मध्ये राजरोस घडत असल्याची चर्चा होती. 21 व्या शतका दिवसाढवळ्या असे घडलं यावर लवकर विश्वास बसत नाही. उत्तरप्रेदशातली कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले अशी ही घटना आहे.

पोलीस पोहचल्याचा पत्ता लागल्यावर विकास दुबे यांच्या टोळीने पोलिसांपासून वाचण्यासाठी रस्त्यात जेसीबी लावला. त्यामुळे पोलीस पुढे वाहनाऐवजी पायी गेले. याच वेळी उंच ठिकाणी बसलेल्या विकास दुबेच्या टोळीने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात आठ पोलिसांना वीरमरण आले. विकास दुबे हा खतरनाक, कुख्यात अपराधी आहे. दुबेच्या विरोधात 50 गुन्ह्याच्या नोंदी आहेत. त्यात खुन, अपहरण, खंडणी सारखी प्रकरणे आहेत. विकास दुबेनं 2001 मध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये घुसून तत्कालिक राज्यमंत्री शुक्ला यांची गोळी मारुन हत्या केली होती. विकास दुबेच्या गुन्ह्यांचा इतिहास पाहता मोठी टीम त्याला पकडण्यासाठी गेली होती. पोलीस टीम गावात दाखल झाली.

जखमी झालेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये पाच पोलीस, एक होमगार्ड आणि आणखी एकावर कानपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी दुबे आणि त्याच्या टोळीला पकडण्यासाठी पथक तैनात केली आहेत. लखनऊमध्ये असलेल्या दुबेच्या घरावर पोलिसांनी छापेमारे सुरु केली आहे. ह्या घटनेनं मुख्यमंत्री योगींच्या उत्तर प्रदेशमधल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

PM Narendra Modi | विस्तारवादाचा काळ सरला,आता विकासवादाचा काळ, मोदींनी चीनला सुनावलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Embed widget