मुस्लिम महिलांना दिली बलात्काराची धमकी, बजरंग मुनिदास यांना अटक
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनिदास यांना बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी देणाऱ्या महंत बजरंग मुनिदास यांना बुधवारी न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी उत्तर प्रदेशच्या सीतापूर पोलिसांनी बजरंग मुनिदास यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले होते. उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंतांच्या विरोधात मुस्लिम महिलांनी धरणे आंदोलन केले होते. घटनेच्या सहा दिवसांनंतर पोलिसांनी बजरंग मुनिदास यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यत सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी द्वेषपूर्ण भाषणाचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत बजरंग मुनीदास हे द्वेषपूर्ण भाषण देत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओमध्ये बजरंग मुनीदास यांनी मुस्लिम महिलांबद्दल अपशब्द वापरले होते.
TRIGGER WARNING!
— Mohammed Zubair (@zoo_bear) April 7, 2022
A Mahant in front of a Masjid in the presence of Police personals warns that He would K!dnap Muslim Women and ₹@pe them in Open.
According to the locals near Sheshe wali Masjid, Khairabad, Sitapur. This happened on 2nd Apr 2022, 2 PM. @sitapurpolice @Uppolice pic.twitter.com/wkBNLnqUW0
मुस्लीम महिलांनी या द्वेषपूर्ण भाषणावरून महंतांच्या विरोधात धरणे आंदोलन केले. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने 1 आठवड्याच्या आत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. बजरंग मुनिदास यांचा हा व्हायरल व्हिडीओ 'Zoo Bear' नावाच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यात ते एका विशिष्ट समाजाच्या महिला आणि मुलींवर घरातून बाहेरकाडून बलात्कार करा, असं बोलत असल्याचं स्पष्टपणे ऐकू येत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Nepal : नेपाळसह संपूर्ण दक्षिण आशियात डॉ.बाबासाहेबांचा प्रभाव; नेपाळच्या राष्ट्रपतींकडून स्मरण
- India : रशियाकडून तेल खरेदीवर अमेरिकेची भारताला सूचना, मंत्री जयशंकर यांच्या उत्तराने...
- Gautam Adani news : मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, सहाव्या क्रमांकावर मिळवले स्थान
- Sri Lanka Gold Rate : सोन्याच्या लंकेत खऱ्याखुऱ्या सोन्याचा भाव चक्रावून सोडणारा, एक तोळा सोनं तब्बल..