एक्स्प्लोर
नवविवाहित दाम्पत्याचं शूटिंग करणारा गजाआड
पिरनवाडी येथे एक नवविवाहित दाम्पत्य भाड्याने घर घेऊन राहण्यास आले होते. त्यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या तरुणाने दररोज नवविवाहित दाम्पत्य घरात असताना खिडकीतून चोरून शुटिंग करण्यास सुरुवात केली होती.
बेळगाव : नवविवाहित दाम्पत्याच्या घरातील रात्रीच्यावेळी शूटिंग मोबाईलवर करणाऱ्या एका आंबट शौकिनाला पोलिसांनी अटक केली आहे. घराच्या खिडकीतून तो नवविवाहित दाम्पत्याचे शूटिंग मोबाईलवर करत होता.
सुनील वाडकर असे या आंबटशौकिनाचे नाव आहे. पिरनवाडी येथे ही घटना घडली आहे.
पिरनवाडी येथे एक नवविवाहित दाम्पत्य भाड्याने घर घेऊन राहण्यास आले होते. त्यांच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या तरुणाने दररोज नवविवाहित दाम्पत्य घरात असताना खिडकीतून चोरून शुटिंग करण्यास सुरुवात केली होती.
सतत पाच दिवस रात्रीच्यावेळी त्याने नवविवाहित दाम्पत्याच्या हालचालींचे शुटिंग आपल्या मोबाईलमध्ये केले होते. सहाव्या दिवशी मात्र तो शूटिंग करताना नवविवाहित दाम्पत्याच्या नजरेस पडला. त्यांना आपल्या घराशेजारी राहणारी व्यक्तीच शूटिंग करते हे समजले. लगेच त्यांनी या संबंधी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची दखल आणि प्रकरणाचे गांभीर्य ध्यानात घेऊन सुनील वाडकर याला अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement