एक्स्प्लोर
नीरव मोदी फरार नाही, कामासाठी अगोदरपासूनच परदेशात : वकील
नीरव मोदीची केस लढण्यासाठी रात्री उशिरा दुबईहून भारतात आलेले वकील विजय अग्रवाल यांनी या घोटाळ्यातील प्रश्नांची उत्तरं दिली.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर डायमंड किंग नीरव मोदी भारतातून पसार झाला आहे. मात्र नीरव मोदी पळाला नसून कामानिमित्त अगोदरपासूनच देशाबाहेर असल्याचा दावा त्याच्या वकिलाने केला आहे. नीरव मोदीची केस लढण्यासाठी रात्री उशिरा दुबईहून भारतात आलेले वकील विजय अग्रवाल यांनी या घोटाळ्यातील प्रश्नांची उत्तरं दिली.
PNB घोटाळा : विपुल अंबानीसह 5 जणांना सीबीआयची अटक
नीरव मोदी कोणत्या देशात आहे, या प्रश्नाचं उत्तर वकिलांनी दिलं नाही. मात्र हा घोटाळ्या जेवढा सांगितला जात आहे, तेवढा नाही, असाही दावा वकिलाने केला. नीरव मोदी निर्दोष असल्याचाही दावा वकिलाने केला. नीरव मोदी प्रकरणात पुढे काहीही होणार नाही : वकील नीरव मोदी तपास यंत्रणांसमोर हजर होणार नाहीत, असंही वकिलाने स्पष्ट केलं. तपास यंत्रणा सध्या नीरव मोदींच्या कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत, असा आरोप वकिलाने केला. याअगोदरही अनेक घोटाळे समोर आले आहेत, मात्र कोर्टात आरोप सिद्ध झालेले नाहीत. नीरव मोदी प्रकरणातही हेच होणार आहे, असा दावा वकिलाने केला.या सर्व घोटाळ्यांमध्ये बँकेतील तुमचा पैसा किती सुरक्षित आहे?
यापूर्वी 2 जी घोटाळ्यापासून ते बोफोर्स घोटाळ्याच्या सुरुवातीला असंच झालं होतं. मात्र पुढे चालून काहीही हाती लागलं नाही. त्यामुळे नीरव मोदी प्रकरणातही असंच होईल, असा दावा नीरव मोदीच्या वकिलाने केला. नीरव मोदीला अशा पद्धतीने अटक करता येणार नाही, कायदेशीरपणे हे चुकीचं असल्याचं वकिलाने सांगितलं. PNB घोटाळा : विपुल अंबानीसह 5 जणांना सीबीआयची अटक पीएनबी घोटाळ्याप्रकरणी आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मुकेश अंबानींचे नातेवाईक विपुल अंबानीसह पाच जणांवर सीबीआयने कारवाई केली. आतापर्यंत 11 जणांना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे.पीएनबीच्या तीन विभागांमध्ये समन्वय नसल्याने घोटाळा?
फायरस्टार इंटरनॅशनल डायमंड्स ग्रुपचा अध्यक्ष विपुल अंबानी याच्यासोबत तीन फर्म्सच्या कार्यकारी सहाय्यक कविता मणकिकर, फायरस्टार ग्रुपचा वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र आणि गीतांजली ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजली ग्रुपचा व्यवस्थापक नितेन शाही यांना अटक करण्यात आली.तीन वर्षांपूर्वीच पीएनबी घोटाळा रोखला जाऊ शकत होता!
यापूर्वी पीएनबीच्या मुंबईतील ब्रिच कँडी ब्रँचचा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक (डेप्युटी ब्रँच मॅनेजर) गोकुळनाथ शेट्टी, सिंगल विंडो ऑपरेटर मनोज खराज आणि निरव मोदी ग्रुप ऑफ फर्म्सचा अधिकृत स्वाक्षरीकर्ता (ऑथराईज्ड सिग्नेटरी) हेमंत भट याला अटक करण्यात आली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement