एक्स्प्लोर

पंतप्रधानांचं वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्याची वेळ

मात्र राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य सभागृहाच्या कामकाजाची वेळ सरकारवर आली. राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीनंतर दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी केलेल्या टिप्पणीचा काही अंश सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आली. मोदींच्या टिप्पणीवर विरोधी खासदारांनी आक्षेप नोंदवला होता. उपसभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी राज्यसभेत उपस्थित होते. निकालानंतर त्यांनी संक्षिप्त वक्तव्यही केलं होतं. दोन्ही बाजूचे उमेदवार हरी आहेत, याचा संदर्भ घेऊन मोदींनी एक विधान केलं होतं. "आता सगळं हरी भरोसे आहे. हरी कृपा सगळ्यावर राहिल, अशी आशा आहे. दोन्ही उमेदवारांच्या नावात हरी आहे. या निवडणुकीत दोन्ही बाजूला हरी होते, पण एकीकडे बीके थे, त्यांच्या नावाआधी बीके होतं, बीके हरी....कोणीही बीके नाही. हरीवंश यांच्यासमोर 'बीके' नाही," असं म्हणत त्यांनी कोटी करायचा प्रयत्न केला होता. मात्र राष्ट्रीय जनता दलचे खासदार मनोज झा यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला. पंतप्रधानांची भाषा सभागृहाच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही. ही टिप्पणी आक्षेपार्ह असून चुकीच्या उद्देशाने केली होती, असं सांगत ते वक्तव्य कामकाजातून वगळण्याची मागणी सभापतींना केली होती. सभापतींनीही यावर विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं. यानंतर सभापतींच्या निर्देशानुसार सभागृहाच्या कामकाजातून हे वक्तव्य वगळण्यात आल्याची माहिती राज्यसभेच्या सचिवालयाने दिली. "एखाद्या पंतप्रधानाची टिप्पणी कामकाजातून वगळावी लागणं हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे," असा दावा मनोज झा यांनी केला. तसंच सभापतींच्या या निर्णयावर त्यांनी आनंदही व्यक्त केला. दरम्यान, राज्यसभेच्या उपभापतीपदाची निवडणूक अखेर एनडीएनं जिंकली. सत्तापक्षाकडून जेडीयूचे हरीवंश सिंह यांना 125 तर यूपीएचे उमेदवार बी के हरीप्रसाद यांना 105 मतं मिळाली. राज्यसभेत सध्या 244 खासदार आहेत, पण त्यातल्या 232 खासदारांनीच मतदानात सहभाग घेतला. त्यामुळे बहुमताचा आकडा 117 बनलेला होता. बहुमतापेक्षा 8 मतं अधिक मिळवून सत्ताधाऱ्यांनी या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget