Corona Vaccine| पंतप्रधानांची 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
Corona Vaccine| पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हर्च्युअली बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पंतप्रधान कोरोना लसीकरण (rollout of vaccine) कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा करणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याचं समजतंय. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे.
देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. Covishield चे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे.
ब्रिटनकडून आणखी एका कोरोना लसीला मंजूरी, 70 लाख डोसची मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांशी कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाशी संबंधित केंद्राची योजना काय आहे यावर चर्चा करणार आहेत. या लसीकरणाच्या रोलआउट दरम्यान उद्भवणाऱ्या समस्या आणि त्याचे निराकरण तसेच सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मच्या ऑपरेशनल क्षमतेची माहिती घेण्यासाठी नुकतंच नॅशनल ड्राय रनदेखील करण्यात आलं होतं.
भाजपचे देशव्यापी अभियान सत्ताधारी भाजपचे नेते नागरिकांमध्ये कोरोना लसीबाबतीत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासाठी देशव्यापी अभियान सुरु करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितलं की, कोरोनाच्या लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भाजपतर्फे मोठ्या प्रमाणावर अभियान सुरु करण्यात येणार आहे. देशात कोरोनाच्या लसीची उपलब्धता करुन देणं हे सरकारचं मोठं यश आहे. पक्षाच्या या अभियानाच्या माध्यमातून कोरोनाच्या लसीविषयी लोकांच्या मनात ज्या शंका आहेत त्या दूर केल्या जाणार आहेत. यामध्ये पक्षाचा प्रत्येक नेता सामील होणार आहे.
खासदार आणि आमदारांना लसीकरणात प्राधान्याची सूचना सूत्रांच्या मते, 29 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. या दरम्यान राज्यसभा आणि लोकसभेचे पीठासन अधिकारी लसीकरणाच्या प्राथमिकतेच्या विषयावर सरकारशी चर्चा करणार असल्याचं समजतंय. गुरुवारी झालेल्या राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत बिहारचे आरोग्य मंत्री मंगल पांडे यांनी सर्व खासदार आणि आमदारांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राथमिकता द्यावी अशी मागणी केली होती.