एक्स्प्लोर
मोदींच्या एण्ट्रीलाच चीनमध्ये 'भारत माता की जय'च्या घोषणा
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मोदींचं शियामेन शहरात स्वागत केलं. इथेच ब्रिक्स परिषद होते आहे.
बीजिंग: पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेसाठी चीनमध्ये दाखल झाले आहेत. चीनमधील शियामेन शहरात मोदींचं जंगी स्वागत झालं. काल रात्री त्यांनी तिथल्या भारतीयांशी संवादही साधला. महत्त्वाचं म्हणजे मोदी येताच चीनमध्येही ‘भारत माता की जय’च्या घोषणा ऐकायला मिळाल्या.
दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज मोदींचं शियामेन शहरात स्वागत केलं. इथेच ब्रिक्स परिषद होते आहे. 3 ते 5 सप्टेंबरदरम्यान मोदी चीनमध्ये असतील.
जिनपिंगसोबतच्या मुलाखतीकडे देशाचं लक्ष
डोकलाममधल्या सीमेवरून भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण झाल्यानं दोन्ही देशांसाठी ही परिषद अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र चीननं पाकिस्तानची पाठराखण करण्याचं धोरण स्वीकारलंय. दहशतवादाच्या मुद्यावरून भारतानं पाकिस्तानला लक्ष्य करू नये असा इशारा चीनच्या शी जीनपिंग यांनी भारताला ब्रिक्स परिषदेपूर्वी दिलाय. तर दहशतवाद जन्माला घालणाऱ्या पाकिस्तानला भारत खडेबोल सुनावणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांकडून समजतंय.
याशिवाय रशिया या सर्व प्रकरणांवर काय भूमिका घेणार याकडे देखील अमेरिका लक्ष ठेवून आहे. त्यामुळं चीनमध्ये होणारी ब्रिक्स परिषद भारत, चीन आणि पाकिस्तानसह इतर आशियाई देशांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.
चीन दौरा का महत्त्वाचा?
परराष्ट्र संबंध: पंतप्रधान मोदी ब्रिक्स देशांसोबत वैश्विक आर्थिक स्थिती, आर्थिक प्रशासन, सुरक्षा, विकास यांसह आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.
डोकलाम : ब्रिक्स परिषदेत अन्य कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होवो न होवो, पण भारत आणि चीन यांच्यातील डोकलाम वादावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या दोन्ही देशांनी या परिसरातून सैन्य मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. या वादानंतर लगेचच दोन्ही देशांचे प्रमुख भेटत असल्याने याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.
दहशतवाद: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा तळ, मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याची भारताची मागणी या सर्व मुद्द्यांवर इथे चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत या मुद्द्यांना हात घालेल. दरम्यान, चीन या मुद्द्यांबाबत थेट चर्चेपासून नेहमीच लांब राहिलं आहे, मात्र आता संधी आली आहे.
ब्रिक्स आणि भारत
- सर्व देशांच्या पहिल्या इंग्रजी अक्षराने मिळून ब्रिक्स हा शब्द तयार झाला आहे. 2009 मध्ये ब्रिक तयार झाला आणि 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या प्रवेशाने त्याचं रुपांतर ब्रिक्समध्ये झालं.
- ब्रिक्समध्ये – ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे.
- ब्रिस्क देशांचं 2012 सालचं चौथं आणि 2016 सालचं आठवं संमेलन भारतात झालं होतं.
- यंदा पहिल्यांदाच पाहुणे राष्ट्र म्हणून थायलंड, मेक्सिको, इजिप्त, तजाकिस्तान आणि गिनी या देशांना आमंत्रित केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement