एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीच माहिती देत अशा परिस्थितीत भारतविरोधी आणि हिंसक वक्तव्य शातंतेत भंग आणू शकतात. हिंसा मुक्त वातावरण निर्माण करणे आणि दहशतवाद मिटवण्याबाबत पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा केली. पाकिस्तान आणि जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांची येणारी वक्तव्य याविषयावर ही चर्चा झाल्याचं समोर येत आहे. पाकिस्तानमधील नेत्यांची भाषा शांततेत भंग आणत असल्याचं मोदींनी ट्रम्प यांना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्याशी चर्चेदरम्यान ओसाका येथील जी-20 शिखर संमेलनाचा देखील उल्लेख केला. या चर्चेदरम्यान पाकिस्तानचं नाव न घेता भारतविरोधी भडकाऊ वक्तव्य केली जात असल्याचं सांगितलं. अशा वक्तव्यांमुळे हिंसाचाराला खतपाणी घातलं जात आहे. अशारीतीने जम्मू काश्मीरमधील शांतता भंग केली जात आहे, असं मोदींनी ट्रम्प यांना सांगितल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं.

जम्मू काश्मीरमधील परिस्थितीच माहिती देत अशा परिस्थितीत भारतविरोधी आणि हिंसक वक्तव्य शातंतेत भंग आणू शकतात. हिंसा मुक्त वातावरण निर्माण करणे आणि दहशतवाद मिटवण्याबाबत पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदींनी सांगितलं. तसेच शिक्षण, गरीबी, आरोग्य या मुद्द्यांवर काम करण्यास तयार असलेल्या देशांना सहकार्य करण्यास तयार असल्याचंही मोदींनी सांगितलं.

याआधी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याची फोनवर चर्चा केली होती. जम्मू काश्मीरचा मुद्दा दोन्ही देशांनी द्विपक्षीय चर्चा करुन मिटवावा, असं ट्रम्प यांनी इम्रान खान यांना सांगितलं होतं.

भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. तसेच भारताचे पाकिस्तानमधील राजदूत यांनाही परत पाठवलं होतं. त्यानंतर सातत्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महसूद कुरेशी सातत्याने भारतविरोधी वक्तव्य करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
भारतीय फुटबॉल संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा! पहिल्याच सामन्यात भारताची विजय सलामी
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं
गोकुळमधील दूध उत्पादकांच्या मतांवर दरोडा, जनमताची केलेली ही भेसळच, संचालक 12 वरून 16 करत भाजपचा बहुमतावर ताबा; राहुल गांधींचा भाजपवर सडकून प्रहार, सतेज पाटलांनी सु्द्धा रणशिंग फुंकलं

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Embed widget