(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली, मुंबई आणि कोलकात्यात अद्ययावत कोरोना टेस्टिंग लॅबचे उद्घाटन
भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी ही अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत.
मुंबई : भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी उच्च क्षमतेच्या अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रयोगशाळांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधानांनी प्रत्येक देशवासियाला कोरोनापासून वाचविणे हा आपला संकल्प असून इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशाने वेळीच तातडीची पाऊले उचलल्याने कोरोनामुळे होणारे मोठ्या प्रमाणावर मृत्यू रोखल्याचे आणि 10 लाख लोक बरे झाल्याचे सांगितले.
पंतप्रधान म्हणाले, आपल्या देशातले शास्त्रज्ञ कोरोनावर लस शोधण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. कोरोनाच नाही तर इतर प्राणघातक आजारांवरही ही लस उपयोगी ठरेल.
महाराष्ट्राने अगदी प्रारंभापासून कोरोनाविरुद्ध प्रखर लढा दिला आहे. या साथींच्या रोगात प्रतिकार शक्तीचे महत्व लक्षात घेऊन मुंबईत रोगप्रतिकारशक्तीविषयक अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली.
चाचणी केंद्राविषयी माहिती
भारतीय वैद्यक संशोधन परिषद ( ICMR) ने देशातील तीन ठिकाणी ही अद्ययावत चाचणी सुविधा उभारली आहे. महाराष्ट्रात मुंबई येथे राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान ( NIRRH) तसेच कोलकाता आणि नोएडा अशी ही तीन ठिकाणे आहेत.
या उच्च क्षमता केंद्रांमध्ये High Throughput COVID-19 सुविधा असून या यंत्राचे वैशिष्ट्य हे आहे की, कोविड विषाणूच्या 1200 चाचण्या प्रत्येक दिवशी 3 पाळ्यांमध्ये आणि ते सुद्धा परिणामकारकरीत्या केल्या जातात. यात स्वयंचलित नमुना तपासणीची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर केली जाते, ग्रुप टेस्टिंग शक्य होते.
ही संपूर्ण प्रक्रिया यांत्रिक पद्धतीने होत असल्याने चाचणीचा वेग तर वाढतोच शिवाय प्रत्यक्ष हाताळणी न झाल्याने या केंद्रातील व्यक्ती सुरक्षित राहतात. एकदा नमुने या यंत्रात टाकले की कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय प्रक्रिया सुरु होते आणि अव्याहतपणे सुरु राहते. रिमोट एक्सेस पद्धतीने चाचणीचे अहवाल आणि विश्लेषण प्राप्त होते. यात प्रक्रियेवर रिअल टाईम देखरेख ठेवता येते
सध्या राज्यातील प्रयोगशाळामध्ये कोविड चाचणीसाठी बरीच मोठी प्रक्रिया पार पाडावी लागते. मॅन्युअल पद्धतीने RNA काढावा लागतो. त्यानंतर या नमुन्याची आरटीपीसीआर चाचणी दुसऱ्या यंत्रावर घेतली जाते. या नव्या प्रणालीत इतर रोगांना कारणीभूत ठरणारे जीवाणू किंवा विषाणू यांच्याबाबतीत देखील नमुन्यांची चाचणी करता येते, जसे की, एचआयव्ही, एचसीव्ही, सीएमव्ही सद्य परिस्थितीत राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधानमध्ये आरटीपीसीआरवर आधारित प्रयोगशाळेत 200 चाचण्या दिवसाला होऊ शकतात.
राष्ट्रीय प्रजनन स्वास्थ अनुसंधान संस्थानने महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मॉडेल रुरल हेल्थ युनिट स्थापन केले असून ग्रामीण भागातील सार्वजनिक आरोग्याची काळजी घेण्यात येते. पालघर जिल्हाधिकारी यांच्या सहकार्याने या संस्थेने डहाणू येथे देखील एक चाचणी सुविधा सुरु केली आहे.