एक्स्प्लोर
Advertisement
जुन्या विचाराने गेलो असतो तर राम मंदिर, करतारपुर प्रश्न सुटले नसते; मोदींची काँग्रेसवर टीका
आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भाषण दिलं. यावेळी सरकारमधील विकासकामांचा पाढा त्यांनी वाचला.
नवी दिल्ली : काँग्रेसच्या विचाराने गेलो असतो तर देश बदलला नसता, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणात केलंय. जुन्या विचारांनी गेलो असतो तर देश बदलला नसता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं लोकसभेत अभिभाषण झालं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत भाषण केलं. राष्ट्रपतींचे अभिभाषण देशाला नवी दिशा देणारं असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. विकासकामामुळेच जनतेने पुन्हा काम करण्याची संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.
करतारपुर कॉरिडोर, राम मंदिर, असे प्रश्न जुन्या मार्गाने गेलो असतो तर सुटले नसते, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण दिलं. यावेळी भाजप सरकारच्या काळात झालेल्या विकासकामांचा पाढा त्यांनी वाचून दाखवला. मोदींनी आपल्या भाषणातून नव्या भारताचं चित्र मांडलं. राष्ट्रपतींचं भाषण देशाला नवी दिशा देणारं आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करणार असल्याचे मोदी म्हणाले.
भाजप पदाधिकाऱ्याला धमकवल्याप्रकरणी अपक्ष आमदाराला अटक आणि सुटका
मोदींच्या भाषणातील मुख्य मुद्दे -
मोदींच्या भाषणात यावेळी ईशान्य भारताचा उल्लेख अधिक होता. केंद्र सरकारच्या कामामुळे ईशान्य भारतात नवी पहाट उगवल्याचे मोदी म्हणाले.
ईशान्य भारतातील राज्यांना जी दिल्ली मागील पाच वर्ष दूर वाटत होती ती आता जवल आलीय
वीज असो, रेल्वे असो, विमानतळ असो, मोबाइल कनेक्टिव्हिटी असो, आम्ही हे सर्व करण्याचा प्रयत्न केला आहे.
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढावा, देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबूती मिळावी यासाठी आम्ही पावलं उचलल्याचं सांगितले.
तुमच्यासाठी गांधीजी ट्रेलर असतील मात्र आमच्यासाठी आयुष्य आहे.
शेतकऱ्यांना कोणत्याही कटकटीविना थेट त्यांच्या खात्यात पैसे जातायेत.
विकासकामामुळेच आम्हाला पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे.
आम्हीही तुमच्याच रस्त्यानं चालत राहिलो असतो, तर 70 वर्षानंतरही 370 कलम हटवलं गेलं नसतं.
तुमच्याप्रमाणेच काम केलं असतं, तर मुस्लीम महिलांना आजही तिहेरी तलाकची भिती वाटत राहिली असती.
राम जन्मभूमी वाद आणि कतारपूर साहिब कॉरिडॉरही झाला नसता.
तुमच्याच मार्गानं चालत राहिलो असतो, तर भारत-बांगलादेश वाद कधीच सुटला नसल्याचे सांगत मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.
Raj Thackeray | राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement