एक्स्प्लोर
सैन्याबाबत मोदींची मोठी घोषणा : तिन्ही सैन्यदलांसाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफची नेमणूक
र्व भारतीय आज देशाचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला आहेत. दरम्यान, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तीनही सैन्यदलांबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
नवी दिल्ली : सर्व भारतीय आज देशाचा 73 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत. सर्वत्र तिरंगा फडकवण्यात आला आहेत. दरम्यान, नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्यादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी तीनही सैन्यदलांबाबत (भूदल, हवाई दल आणि नौदल) एक महत्त्वपूर्ण घोषणा केली.
मोदी म्हणाले की, तिन्ही सैन्यदलांमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि प्रभावी नेतृत्वासाठी 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' नावाचे पद असेल. या पदावरील अधिकारी हे तीनही सैन्यदलांच्या प्रमुखांचे वरीष्ठ अधिकारी असतील.
आतापर्यंत तीनही सैन्यदलांचे वेगवेगळे मुख्य अधिकारी होते. तर राष्ट्रपती हे तीनही दलांचे प्रमुख असतात. देशाच्या भूदलाचे प्रमुख (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) हे भूदलाचे सेनापती असतात. बिपिन रावत हे या पदावर कार्यरत आहेत. तर एअर चीफ मार्शल हे हवाई दलाचे मुख्य अधिकारी असतात. बिरेंद्रसिंह धनोआ हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. त्याचप्रमाणे चीफ ऑफ दी नेव्हल स्टाफ हे नौदलाचे मुख्य अधिकारी असतात. परंतु आता या तीनही मुख्य अधिकाऱ्यांच्या वर एक वरीष्ठ अधिकारी असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement