(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Russia Ukraine War : पंतप्रधान मोदी आणि जो बायडन यांच्यात ऑनलाईन बैठक, रशिया-युक्रेन युद्धावर झाली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden) यांच्यात आज ऑनलाईन बैठक झाली आहे.
Russia Ukraine War : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden) यांच्यात आज ऑनलाईन बैठक झाली. दोन्ही नेत्यांच्या या बैठकीत रशिया आणि युक्रेनमधील युद्धावर चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगातील दोन सर्वात जुने आणि सर्वात मोठी लोकशाही म्हणून आम्ही नैसर्गिक भागीदार आहोत. युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असताना आमच्यातील चर्चा अशा वेळी होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बुचा येथील हत्याकांडाचाही उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले, बुचामधील निष्पाप नागरिकांच्या हत्येच्या बातम्या अतिशय चिंताजनक आहेत. त्याचा आम्ही निषेध करून पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतून शांततेचा मार्ग निघेल, अशी आम्हाला आशा आहे. मी युक्रेन आणि रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी बोललो आहे. त्यावेळी मी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी थेट बोलण्याची सूचना केली आहे."
#WATCH मैंने यूक्रेन और रूस दोनों के राष्ट्रपतियों से कई बार फ़ोन पर बातचीत की। मैंने न सिर्फ़ शांति की अपील की बल्कि मैंने राष्ट्रपति पुतिन को यूक्रेन के राष्ट्रपति के साथ सीधी बातचीत का सुझाव भी दिया। हमारी संसद में भी यूक्रेन के विषय पर बहुत विस्तार से चर्चा हुई है: PM मोदी pic.twitter.com/TefwOrKWQu
— ANI_HindiNews (@AHindinews) April 11, 2022
"आम्ही युक्रेनमधील लोकांच्या सुरक्षेला आणि त्यांना मानवतावादी मदतीच्या पुरवठ्याला महत्त्व दिले आहे. आमच्या वतीने आम्ही युक्रेन आणि त्याच्या शेजारी देशांना औषधे आणि इतर मदत सामग्री पाठवली आहे. युक्रेनच्या मागणीनुसार आम्ही लवकरच औषधांची दुसरी खेप पाठवत आहोत, अशी माहित नरेंद्र मोदी यांनी या बैठकीवेळी दिली.
"या भीषण हल्ल्यात बळी पडलेल्या युक्रेनमधील लोकांना भारताच्या मानवतावादी पाठिंब्याचे मी स्वागत करतो. आमची मजबूत आणि प्रगतीशील संरक्षण भागीदारी आहे. रशियाच्या युद्धाच्या परिणामांचे व्यवस्थापन आणि स्थिरीकरण कसे करता येईल यावर भारत आणि अमेरिका जवळून सहकार्य करत राहतील, असे जो बायडन यांनी म्हटले आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
मोदींनी केलं पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचं अभिनंदन, दहशतवादाचा उल्लेख करत म्हणाले...