एक्स्प्लोर

PM Modi : गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर; आरबीआयच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

RBI 90 Years Anniversary : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनतेना संबोधित करताना म्हटलं, रिझर्व्ह बँक (RBI) च्या स्थापना दिनानिमित्त मी RBI च्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो. देशाला नवी दिशा दाखविण्याचे काम आरबीआयने केले आहे. देशाच्या विकासात आरबीआय महत्त्वाची आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली, यूपीआयला चालना मिळाली. भारताची बँक व्यवस्था जगातील आघाडीची बँकीग व्यवस्था मानली जातेय. देशाच्या विकासासाठी भारतीय रिझर्व्ह बँक महत्त्वाची आहे, असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

आरबीआयच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 90 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, अर्थमंत्री निर्मला सीतारमन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.

गेल्या 10 वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा

यावेळी पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं की, एकेकाळी तोट्यातील अर्थव्यवस्था आज नफ्यात आहे. बँकीग व्यवस्थेतील स्थित्यांतर हा अभ्यासाचा विषय आहे. 2014 आधी बँकीग व्यवस्था डगमगली होती. गेल्या 10 वर्षात बँकींग क्षेत्रात मोठ्या सुधारणा झाल्या आहेत. गेल्या 10 वर्षात झाले, तो फक्त ट्रेलर आहे. येत्या काळात आणखी बदल घडवायचे आहेत, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

आज तुम्ही जे धोरण बनवाल काम कराल त्याअनुषंगाने आरबीआयच्या पुढील दशकातील दिशा ठरणार आहे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. ते पुढे म्हणाले की, आज भारताची बॅंकिंग सिस्टिमला स्ट्राँग आणि सस्टेनेबल सिस्टिम मानली जाते. जी बॅंकिंग सिस्टिम डुबणार होती, ती आता नफ्यात आली आहे आणि विक्रम करतेय. मागील 10 वर्षात मोठे परिवर्तन आणणे सोपे नव्हते. आमच्या नीतीमध्ये स्पष्टता होती. आज देश पाहतोय, नियत सरळ असते, तेव्हा नीती सरळ असते. 

पंतप्रधान मोदी म्हणाले की, पब्लिक सेक्टर सुधारण्यासाठी साडे तीन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. 27 हजार पेक्षा जास्त अप्लिकेशन ज्यात डिफॉल्ट होत्या. बँकांचा ग्रॉस एनपीए 2018 मध्ये सव्वा अकरा टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. तो आता 2023 पर्यंत आता तीन टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. बॅंकिंग क्रेडिट ग्रोथ 15 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आरबीआयची यात मोठी भूमिका आहे आणि ते अभिनंदनास पात्र आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान रचतेय

भारताची प्रगती वेगाने व्हावी आणि इक्लुझिव्ह व्हावी यासाठी आरबीआयला पाऊलं उचलावे लागतील. आरबीआय विविध क्षेत्राला लागणाऱ्या गरजांसंदर्भात भूमिका आरबीआयनं घ्यावी, बँकांना मदत करावी, सरकार आरबीआयसोबत आहे. महागाई कमी व्हावी, यासंदर्भात आधी धोरण व्यवस्थित नव्हतं, मात्र पतधोरण समितीनं त्यावर काम केलं. कोरोना आणि युद्धात देखील महागाई दर आटोक्यात आपण ठेवला. ज्यांचे व्हिजन व्यवस्थित आहे, त्यांची प्रगती होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जगातील मोठे-मोठे देश कोरोनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतायत, त्याच भारतीय अर्थव्यवस्था नवे किर्तीमान स्थापित करत आहे. आरबीआय भारताचा वैश्विकस्तरावर घेऊन जाऊ शकतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget