एक्स्प्लोर

भावाच्या पाया पडून मोदींचा रोड शो, काँग्रेसची तक्रार

गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान होत असताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही.

गांधीनगर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मोदींनी मिनी रोड शो केला. यावर काँग्रेसने आक्षेप घेत, कारवाईची मागणी केली आहे. गुजरातच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान होत असताना आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मतदारांना आकर्षित करण्याची संधी सोडली नाही. आपले मोठे बंधू सोमभाई यांना चरणस्पर्श करुन मोदी राणिपच्या मतदान केंद्रात गेले. यावेळी ते बराच वेळ रांगेत उभे होते. यावेळी ते लोकांना हात हलवून अभिवादन करत राहिले. मतदानाचा हक्क बजावल्यनंतर शाई लावलेलं बोट दाखवत त्यांनी आधी पायी आणि नंतर गाडीच्या फूटबोर्डवरुन जवळपास 500 मीटरहून जास्त अंतर एक मिनी रोड शोच केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. तसंच मोदी -मोदी असा गजरही सुरु होता. दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी 851 उमेदवार नशीब आजमावत आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत तब्बल 39 टक्के मतदानाची नोंद झालीय. त्यामुळे पहिल्या टप्प्यात कमी झालेलं मतदानही यावेळी भरुन निघेल अशी आशा आहे. काँग्रेसचा आरोप दरम्यान, मोदींनी मतदानाच्या दिवशी रोड शो करुन, आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप, काँग्रेसने केला आहे. निवडणूक आयोग भाजपाला विशेष सूट देत असल्याचा दावा, काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी केला. दिग्गजांचं मतदान दरम्यान मोदींच्या आधी आज सकाळी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ज्यात केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, भाजप अध्यक्ष अमित शाह, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी मतदान केलं. यावेळी अमित शाह यांनी गुजरातच्या विकासाआड येणाऱ्यांना पराभूत करा, असं आवाहनही केलं. ते सपत्नीक मतदानासाठी आले होते. तर आनंदीबेन पटेल यांनी गुजरातमध्ये हार्दिक पटेल फॅक्टर फारसा परिणामकारक ठरणार नाही, असं म्हटलंय. तिकडं अरुण जेटली यांनी सामान्यांप्रमाणे अगदी रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावला. हार्दिक पटेलचं मतदान दुसरीकडे भाजपचा कट्टर विरोधक आणि काँग्रेसच्या टीममधला मोठा भागीदार हार्दिक पटेलनं विरामगाम या आपल्या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी हार्दिकनं अहंकारी लोकांना पराभूत करा, असं आवाहनही केलं. सध्या हार्दिक अहमदाबाद आणि गांधीनगरमध्ये वास्तव्याला असतो. दरम्यान हार्दिकच्या आधीच त्याचे वडील भरतभाई, आई उषाबेन आणि बहीण मोनिका यांनीही मतदान केलं. यावेळी हार्दिकची आई उषाबेन यांनी आपल्याला हार्दिकच्या जीवाची काळजी वाटते, असं सांगून मनातली भीती आणि काळजीही व्यक्त केली. हिराबेन यांचं मतदान तर गांधीनगरमध्ये आपल्या धाकट्या मुलाकडे म्हणजे पंकजभाईंकडे राहणाऱ्या मोदींच्या आई हिराबेन यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळGulabrao Patil : पालकमंत्रिपदाबाबत Dada Bhuse, Bharat Gogawaleवर अन्याय: गुलाबराव पाटीलABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 19 January 2024Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
जे वादळ उठलं होतं, ते आज थांबवण्याचं काम...; अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत बोलताच टाळ्यांचा कडकडाट; राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Nitesh Rane : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असतं तर त्यांनी बांगलादेशींची आरतीच केली असती; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
Mumbai High Court : ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
ब्रेकअपनंतर आत्महत्येला प्रियकर जबाबदार नाही, लग्नास नकार म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; हायकोर्टाकडून तरुणाची निर्दोष मुक्तता
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मुंबईकरांना BEST चा दणका, 15 टक्क्यांनी वीज महागणार, नवीन दरवाढ एप्रिलपासून लागू होणार
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
मनु भाकरच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर, मायेची सावली हरपली; रस्त्यावरील भीषण अपघातात आजी अन् मामाचा मृत्यू
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
गोगावलेंना रायगडचे तर भुसेंना नाशिकचे पालकमंत्रीपद मिळायला हवं होतं, यादी जाहीर झाल्यावर धक्का बसला : उदय सामंत
Pandharpur Crime : चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
चार दिवसाचं ट्रेनिंग अन् दहावी पास बोगस डॉक्टरने थाटला पंढरपुरात दवाखाना, पोलिसांना कुणकुण लागताच फुटलं बिंग; नेमकं काय घडलं?
Dhananjay Munde: मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
मला ठरवून टार्गेट केलं जातंय, पण मी अभिमन्यू नाही, मी अर्जुन आहे; धनंजय मुंडेंनी दंड थोपटले
Embed widget