Omicron Threat In India : देशात ओमायक्रॉनच्या रूग्णांमध्ये वाढ, केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये, पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांसोबत संवाद
देशातील वाढत्या कोरोना (corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron ) परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
Omicron Threat In India : कोरोनाचा (corona) नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या (Omicron ) रूग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत.
गेल्या काही दिवासंपासून देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळेच वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. 13 जानेवारी रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान हा संवाद साधतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात वाढत्या ओमाक्रॉनसंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्यावर उपाययोजना, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी पर्याय, औषधांच्या उपलब्धतेसह आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांचा आढावा घेण्यात आला होता. याबरोबरच ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, पीएसए प्लांट, आयसीयू, ऑक्सिजन बेड आणि लसीकरणाच्या स्थितीचा आढावा घेण्यात होता.
दरम्यान, सोमवारी देशात 1 लाख 79 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर 277 लोकांचा मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. तर देशात आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 70 हजार 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या