PM Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची संपत्ती 26 लाखांनी वाढली, एकूण संपत्ती 2.23 कोटींवर
PM Narendra Modi Assets : पंतप्रधानांकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही, तसेच त्यांच्याकडे 35,250 रुपये इतकी रक्कम कॅशमध्ये असल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये 26 लाखांची भर पडली असून ती आता 2.23 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यांच्या या संपत्तीमध्ये कोणत्याही स्थावर मालमत्तेचा समावेश नाही. या पैकी बहुतांश संपत्ती ही बँक डिपॉझिटच्या स्वरुपात असून मोंदींकडे 1.73 लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. पीएमओने ही संपत्ती जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 31 मार्चपर्यंतची संपत्ती जाहीर करण्यात आली असून त्यांची कोणत्याही बॉन्ड, शेअर्स किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक नाही. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या गांधीनगरमध्ये असलेल्या जमिनीचे दान केलं असल्याचाही उल्लेख यामध्ये आहे. एका वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीमध्ये 26.13 लाखाची भर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सध्याची संपत्ती ही 2,23,82,504 रुपये इतकी आहे.
पंतप्रधानांकडे कॅश किती आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2002 साली गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांना गांधीनगरमध्ये एक जमीन खरेदी केली होती. त्यामध्ये त्यांच्यासोबत इतर तीन हिस्सेदार होते. ती जमीन त्यांनी दान केल्याची माहिती या संपत्तीपत्रामध्ये नोंद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 35,250 रुपये इतकी रक्कम कॅशमध्ये असल्याची माहिती आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये त्यांच्या नावे 9,05,105 रुपये डिपॉझिट आहेत. तसेत मोदींकडे 1,89,305 रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य शिंदे, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी, पुरषोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांच्यासह इतर 29 केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: