PM Modi Pune Visit LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. त्याआधी पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेकमध्ये देखील लसीसंदर्भात भेट देणार आहेत.
LIVE
Background
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (PM Narendra Modi tour serum Institute Pune) भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं होतं.
पीएमओने केलेल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी लस निर्मिती प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील कामाबाबत पाहणी करणार आहेत. ते यासाठी तीन शहरांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान अहमदाबादमधील झायडस कॅडिला पार्क, हैदराबादमधील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये भेट देणार आहेत.
एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पंतप्रधान सकाळी 9.30 वाजता अहमदाबादमध्ये झायडस कॅडिला पार्कमध्ये भेट देतील त्यानंतर ते दुपारी 1.30 पर्यंत पंतप्रधान भारत बायोटेक, हैदराबादला भेट देणार आहेत. त्यानंतर ते पुण्यात येतील. पुण्यात Serum Institute ला ते 4:30 वाजता भेट देतील अशी माहिती आहे.
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या या लसीकडे देशासह जगाचे लक्ष लागून आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आलीय हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात येणार आहेत.
PM Modi | पंतप्रधान मोदींचा पुणे, अहमदाबाद, हैदराबाद दौरा;कोरोना लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेणार
PM Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे, अहमदाबाद, हैदराबाद दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी ते कोरोना लसनिर्मिती प्रक्रियेची माहिती घेणार आहेत.Subscribe to ou...