PM Modi New Car : स्फोटकं असो की AK47, अभेद्य सुरक्षा कवच, पंतप्रधान मोदींची 12 कोटीची कार नेमकी आहे कशी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात एका नव्या कारचा समावेश झाला आहे. जाणून घेऊयात या कारच्या फिचर्सबाबत...
PM Modi New Car Mercedes Maybach S650 Price & Safety features : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)यांच्या ताफ्यात एक नव्या कारचा समावेश नुकताच झाला आहे. या कारचे नाव Mercedes-Maybach S 650 Guard असं आहे. या कारमध्ये काही खास फिचर्स आहेत. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षित प्रवासासाठी या कारच्या सेफ्टी फिचर्सकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
कारबद्दल काही खास गोष्टी
रिपोर्टनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्सिडीज मेबॅक एस 650 ही नवी गाडी दिल्लीमधील हैद्राबाद हाऊसमध्ये पाहण्यात आले होते. यावेळी या गाडीमधून पंतप्रधान मोदी हे रूसचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यास आले होते. या गाडीमध्ये VR10-लेव्हल प्रोटेक्शन या गाडीमध्ये आहे. तसंच 15 किलो विस्फोटकांच्या शक्तीशाली स्फोटातही ही गाडी सुरक्षित राहू शकते. रिपोर्टनुसार या गाडीची किंमत 12 कोटी रूपये आहे. AK-47 रायफलने होणाऱ्या हल्ल्यापासून देखील ही कार बचाव करेल. गाडीच्या खिडक्यांना आतल्याबाजूने पॉलीकार्बोनेटचे कोटिंग करण्यात आले आहे. या कारच्या अंडर-बॉडीला विशेष प्रकारे तयार करण्यात आले आहे. ज्यामुळे स्फोट झाला तरी कारमध्ये बसलेली व्यक्ती सुरक्षित असेल.
कारमध्ये असणारे फिचर्स
कारमध्ये 6.0 लिटर ट्विन टर्बो V12 इंजन आहे. तसेच या गाडीचा टॉपर स्पीड हा 160 kmph आहे. कारला स्पेशल रन फ्लॅट टायर्स आहेत. ज्यामुळे गाडी डॅमेज किंवा पंक्चर झाली तरी गाडी थांबत नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात BMW 7 Series High-Security Edition, Land Rover Range Rover Vogue आणि Toyota Land Cruiser या आलिशान गाड्या देखील आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
नवीन वर्षापासून ATM मधून पैसे काढणे महागणार, पाहा काय आहेत नियम...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha