PM Modi in Ayodhya | पारंपरिक धोती-कुर्ता, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींचा खास पेहराव
अयोध्येत प्रभू श्री राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज पार पडणार आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी होणार आहे. या सोहळ्यासाठी मोदींनी खास पेहराव केला आहे.
![PM Modi in Ayodhya | पारंपरिक धोती-कुर्ता, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींचा खास पेहराव PM Modi Leaves for Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan PM Narendra Modi wears Dhoti Kurta for Mandir Pujan PM Modi in Ayodhya | पारंपरिक धोती-कुर्ता, राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदींचा खास पेहराव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/08/05162844/Modi-Dhoti-Kurta.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन करणार आहे. यासाठी मोदी विशेष विमानाने राजधानी दिल्लीहून सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. पंरतु आजच्या या ऐतिहासिक दिवसासाठी मोदींचा पेहराव नेहमीपेक्षा वेगळा आहे. मोदी सामान्यत: चुडीदार पायजमा आणि कुर्ता परिधान करतात. मात्र आज पारंपरिक सोनेरी-पिवळा कुर्ता, धोती आणि गळ्यात गमछा घालून रवाना झाले आहेत.
पंतप्रधानांच्या पेहरावाने सगळेच आश्चर्यचकित सामान्यत: चुडीदार पायजमा आणि कुर्ता परिधान करणारे पंतप्रधान मोदींच्या कपड्यांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. सोनेरी-पिवळा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाची धोती परिधान केलेले पंतप्रधान विशेष आपल्या विमानात चढले. पंतप्रधानांनी या विशेष सोहळ्यासाठी विशेष पेहराव परिधान केला आहे. हिंदू धर्मात सोनेरी आणि पितांबरी रंग अतिशय शुभ समजला जातो. भूमिपूजनासाठी पंतप्रधांनानी हे कपडे परिधान केल्याचं म्हटलं जात आहे.
ABP Exclusive | राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यानिमित्त प्रभू रामललासाठी रत्नजडीत पोशाख
राममंदिरासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न वाखाणण्यासारखे, बाळासाहेब असायला हवे होते : राज ठाकरे
पंतप्रधान मोदींचा संपूर्ण कार्यक्रम पंतप्रधान मोदी सकाळी 9 वाजून 35 मिनिटांनी दिल्लीहून लखनौला रवाना झाले एक तासाने म्हणजेच 10 वाजून 35 मिनिटांनी लखनौमध्ये दाखल झाले इथून पाच मिनिटांनी म्हणजेच 10 वाजून 40 मिनिटांनी ते अयोध्येसाठी रवाना होतील. मोदी साडे अकराच्या सुमारास अयोध्येत पोहोचतील साडेबारा वाजता ते भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. 12 वाजून 40 मिनिटांनी मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होईल. राम मंदिराची पायाभरणी चांदीचा फावडा आणि चांदीच्या विटेने होणार आहे.
तेव्हा मोदी म्हणाले होते, मंदिर बनल्यानंतर अयोध्येत येणार नरेंद्र मोदी 29 वर्षांपूर्वी अयोध्येत गेले होते. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना अयोध्येत पुन्हा कधी येणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर मंदिर बनल्यानंतर इथे येणार असं उत्तर मोदींनी दिलं होतं. आता खुद्द मोदींच्याच हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन पार पडत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- 'बाबरी मस्जिद होती आणि राहील'; राम मंदिर भूमिपूजनाआधी असदुद्दीन ओवैसींचं ट्वीट
- माझ्या हृदयाच्या जवळचं स्वप्न पूर्ण होतंय : लालकृष्ण अडवाणी
- राम मंदिर भूमीपूजनाचा मुहूर्त काढून दिलेले पंडित शर्मा यांना धमक्यांचे फोन
- कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
- राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह 'हे' पाच जण!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)