एक्स्प्लोर

'बाबरी मस्जिद होती आणि राहील'; राम मंदिर भूमिपूजनाआधी असदुद्दीन ओवैसींचं ट्वीट

राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी मंदिराची पायभरणी होणार आहे. या सोहळ्याच्या आधी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी एक ट्वीट केलं आहे.

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते आज अयोध्येत श्री राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. या सोहळ्यानिमित्त अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याआधी सकाळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी एक ट्वीट केलं आहे. ओवेसी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, "बाबरी मशीद होती आणि राहील इंशाअल्लाह”. ओवैसी यांनी हे ट्वीट करताना बाबरी मशीद आणि बाबरी मशीद विध्वंस केल्याचा एक-एक फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर 2019 रोजी विवादित राम मंदिर-बाबरी मशिदीच्या जमीन बाबत निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालामध्ये वादग्रस्त जमीन रामलाला देण्यात आली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने असाही आदेश दिला की अयोध्येतील पाच एकर जमीन मशीद बांधण्यासाठी देण्यात येईल. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या ट्वीटवर ओवैसी यांची टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रियंका गांधी यांच्या राम मंदिर भूमिपूजनावरील वक्तव्याची दखल घेतली. प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यावर ओवैसी म्हणाले की, 'आनंद झाला की आता ते नाटक करत नाही. कट्टर हिंदुत्वाची विचारसरणी स्वीकारायची असेल तर ठीक आहे, पण ते बंधुत्वाच्या मुद्यावर पोकळ वक्तव्य का करतात?’ असा सवाल विचारला आहे. दरम्यान अयोध्येत राम मंदिराचा भूमीपूजन सोहळ्याच्या समर्थनार्थ काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी ट्वीट केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लिहिलं आहे की, 'साधेपणा, धैर्य, संयम, त्याग, वचनबद्धता, दीनबंधू राम नावाचा अर्थ आहे. राम सर्वांमध्ये आहे. राम सर्वांसोबत आहे. भगवान राम आणि देवी सीता यांचा संदेश आणि त्यांच्या आशीर्वादासोबत प्रभू रामाच्या मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम राष्ट्रीय एकता, बंधुत्व आणि सांस्कृतिक मेळावात सहभागी व्हा.' Ram Mandir bhumi pujan | भूमिपूजन सोहळ्याला जाणार; साधू संतांसोबत वावरलोय : इकबाल अंसारी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पार पडणार राम मंदिर भूमिपूजन राम मंदिर भूमिपूजनासाठी अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी मंदिराची पायभरणी होणार आहे. यो सोहळ्याआधी अयोध्येत रस्तोरस्ती स्वागतांचे फलक, सहज कानी पडणारे भजन, रामनामाचा गजर आणि लखलखती विद्युत रोषणाई असे चित्र आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. ऐतिहासिक राम मंदिर भूमीपूजन कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (5 ऑगस्ट) सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अयोध्येला पोहचणार आहेत. नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर सकाळी 11.30 वाजता अयोध्येतील साकेत महाविदयालयाच्या पटांगणात उतरेल. यानंतर ते पहिल्यांदा हनुमान गढीला किंवा राम जन्मभूमीकडे जातील. परंतु सध्या चर्चा अशी आहे की, राम जन्मभूमीच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक तास संबोधन करणार आहेत. ज्याचं प्रसारण अयोध्येत ठिकठिकाणी एलईडी स्क्रिन लाऊन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अयोध्येपासून फैजाबादपर्यंत लाऊड स्पीकरच्या माध्यमातून मंत्रच्चोर ऐकू येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget