PM Modi In Gujarat : PM मोदींनी गुजरात निवडणुकांच्या प्रचाराचा फोडला नारळ, आधी सोमनाथ मंदिरात पूजा, नंतर 5 तासांत 4 सभा!
PM Modi In Gujarat : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुजरातमधील निवडणुकीतील विजयासाठी सर्वच पक्ष जोरात प्रचार करत आहेत.
PM Modi In Gujarat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुजरातच्या (Gujarat) सौराष्ट्र प्रदेशात आज चार जाहीर सभांना संबोधित करत आहेत. गुजरात विधानसभेसाठी 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर या रॅलीचं आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सर्वप्रथम, सोमनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली, त्यानंतर त्यांनी वेरावळ शहरात सभेला संबोधित केले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, गुजरातमध्ये आपल्याला विक्रम मोडायचा आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर भाजपला विजय मिळवायचा आहे. गुजरातबद्दल खूप काही बोलले गेले, गुजरात सरकारने या सर्व संकल्पना संपुष्टात आणल्या. भाजपने गुजरातचे बंदर विकसित केले, गुजरातच्या प्रत्येक विकासात भाजपचा मोठा वाटा आहे.
'गुजरातमध्ये यंदा सर्व विक्रम मोडायचे आहेत' - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज गुजरातची बंदरे भारताच्या समृद्धीचे प्रवेशद्वार बनली आहेत. सौराष्ट्रातील ही माझी पहिलीच निवडणूक रॅली आहे आणि तीही सोमनाथाच्या पावन भूमीवर. कच्छचे वाळवंट आमच्यासाठी अडचणीचे होते, आम्ही कच्छचे हे वाळवंट बदलून 'गुजरातचे तोरण' केले.
मोदी गुजरातमध्ये घरोघरीही प्रचार करू शकतात
पंतप्रधान मोदी सकाळी 11 वाजता वेरावळ सभेनंतर, दुपारी 12:45 वाजता धोराजी, दुपारी 2:30 वाजता अमरेली, दुपारी 4:15 वाजता बोताड येथे सभा घेत आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरला परततील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये घरोघरी प्रचारही करू शकतात आणि व्होटर स्लिपही लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दक्षिण गुजरातमधील वलसाड जिल्ह्यात एका सभेला संबोधित केले. या जाहीर सभेत त्यांनी गुजराती अभिमान जपण्याचे आवाहन करत गुजरातची बदनामी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. अशा लोकांना राज्यात स्थान मिळू नये, असे मोदी म्हणाले होते.
गुजरातमध्ये निवडणुका कधी?
पहिल्या टप्प्याचे मतदान 1 डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. हिमाचल प्रदेशचे निवडणूक निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहेत.
सौराष्ट्रच महत्त्वाचे का?
विशेष म्हणजे गुजरातचे चार क्षेत्र जेथे पंतप्रधान मोदी रविवारी रॅली करणार आहेत ते सौराष्ट्रात येतात. गुजरातमधील विधानसभेच्या 182 पैकी 54 जागा सौराष्ट्रकडे आहेत. सौराष्ट्र जिंकणाऱ्याला गुजरातचा किल्ला जिंकणे सोपे जाते, असे म्हटले जाते. मात्र, सौराष्ट्रातील गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 30 तर भाजपने 23 जागा जिंकल्या होत्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला होता.
इतर महत्वाच्या बातम्या