एक्स्प्लोर

PM Modi Hunkar Rally Bomb Blast : PM मोदी सभा स्फोट प्रकरण: ४ दहशतवाद्यांना फाशीची शिक्षा, दोघांना जन्मठेप

Gandhi Maidan Bomb Blast Case: तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणी एनआयए विशेष न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली आहे.

पाटणा: आठ वर्षांपूर्वी बिहारची राजधानी पाटणामधील गांधी मैदानात  (Gandhi Maidan blast) गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीत (Hunkar rally)  झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयए विशेष कोर्टाने सोमवारी दोषींना शिक्षा सुनावली. कोर्टाने चार दहशतवाद्यांना फाशी शिक्षा ठोठावली आहे. तर, दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अन्य दोघा दोषींना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एका दोषीला सात वर्षांची शिक्षा सुनावली.

 

आज सकाळी सर्व ९ दहशतवाद्यांना पाटणातील बेउर तुरुंगातून एनआयए विशेष कोर्टात सकाळी नेण्यात आले. याआधी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए विशेष कोर्टाने आरोपी फखरुद्दीन याची निर्दोष म्हणून सुटका करण्यात आली. हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दिकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलमसह नऊ जणांना आज एनआयए विशेष कोर्टाने शिक्षा सुनावली. या खटल्यात १८७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला होता.

 

प्रकरण काय?

पाटणातील गांधी मैदानात हुंकार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपाकडून पंतप्रधानपदाचे दावेदार असल्याची घोषणा करण्यात आली. या रॅलीशिवाय पाटणा जंक्शनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १० वर देखील स्फोट झाला होता. पाटणातील साखळी स्फोटात सहा ठार तर ८० हून अधिकजण जखमी झाले होते.

गांधी मैदान साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी २७ ऑक्टोबर २०१३ मध्ये पाटणाच्या गांधी मैदान पोलीस ठाण्यात प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी एनआयएने या प्रकरणी तपास सुरू केला आणि एक नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार नोंदवण्यात आली. यामध्ये अल्पवयीनांसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. एका आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, अल्पवयीन आरोपींना बाल न्यायलयाने याआधीच तीन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

पाच दोषींना अन्य प्रकरणात याआधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामध्ये इम्तियाज, उमेर, अझहर, मोजिबुल्लाह आणि हैदर या दोषींचा समावेश आहे. या दोषींना बौद्धगया साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Maharashtra Live News Updates: ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांसंबंधी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
Embed widget