एक्स्प्लोर
क्रीडादिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांची क्रीडारत्नांशी भेट
नवी दिल्ली : बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, पैलवान साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर आणि नेमबाज जीतू रायसह राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी रविवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.
सिंधू आणि साक्षीबरोबरच दीपा कर्माकर आणि जीतू रायला उद्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते खेलरत्ननं सन्मानित केलं जाणार आहे. या सोहळ्यातच धावपटू ललिता बाबर आणि क्रिकेटर अजिंक्य रहाणेसह पंधरा जणांना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित केलं जाईल. तर दीपा कर्माकरचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांच्यास सहा जणांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
रविवारी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला दिल्लीत सात, रेसकोर्स रोड इथं पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला. नुकत्याच झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं बॅडमिंटन महिला एकेरीचं रौप्यपदक मिळवलं होतं. तर साक्षी मलिकनं कुस्तीत कांस्यपदकाची कमाई केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement