PM Modi : पंतप्रधानांची सैन्य दलासोबत दिवाळी, जवानांसोबत आनंद साजरा करण्यासाठी थेट हिमाचल गाठलं
PM Modi Diwali Celebration with Security Forces : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सीमेवर जवानांसोबत साजरी केली. यासाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशात पोहोचले.
PM Modi Diwali Celebration with Indian Army : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Nrendra Modi) यांनी यंदाही दिवाळी (Diwali 2023) सैनिकांसोबत (Indian Army) साजरी केली. पंतप्रधान मोदी यांनी हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) येते जाऊन सैनिकांसोबत (Security Forces) दिवाळी साजरी (Diwali Celebration) करण्याचा आनंद घेतला. मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ते दरवर्षी दिवाळी सीमेवर किंवा नियंत्रण रेषेवर भारतीय लष्करासोबत साजरी करतात. यंदा पंतप्रधान मोदी सैन्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले.
सीमेवर सैनिकांसोबत पंतप्रधानांची दिवाळी
2014 पासून पंतप्रधान मोदी दरवर्षी देशाच्या जवानांसोबत दिवाळीचा सण साजरा करतात. यंदा दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान मोदी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एक्स मीडियावर पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ''आपल्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो.''
हिमाचल प्रदेशात लष्करासोबत पंतप्रधानांनी दिवाळी साजरी केली
Reached Lepcha in Himachal Pradesh to celebrate Diwali with our brave security forces. pic.twitter.com/7vcFlq2izL
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
पंतप्रधानांच्या देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा
आज दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर म्हणजेच X मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, "देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो."
देश के अपने सभी परिवारजनों को दीपावली की ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2023
Wishing everyone a Happy Diwali! May this special festival bring joy, prosperity and wonderful health to everyone’s lives.
दरवर्षी जवानांसोबत पंतप्रधानांची दिवाळी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 2014 मध्ये सियाचीन ग्लेशियर, 2015 मध्ये पंजाबमधील अमृतसर, 2016 मध्ये हिमाचल प्रदेशातील किन्नौर आणि 2017 मध्ये काश्मीरमधील गुरेझ येथे सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती. यानंतर, 2018 मध्ये, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये आणि 2019 मध्ये जम्मू विभागातील राजौरीमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी 2020 मध्ये राजस्थानमधील जैसलमेर, 2021 मध्ये राजौरी जिल्ह्यातील नौशहरा आणि 2022 मध्ये कारगिलमध्ये दिवाळी साजरी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :