PM Modi : माझं चॅनलही लाईक करा, सबस्क्राईब करा; पंतप्रधान मोदींच्या देशभरातील यूट्यूबर्ससोबत धमाल गप्पा
YouTube Fanfest India 2023 : पंतप्रधान मोदींनी यूट्यूबर्सना संबोधित करताना म्हटलं की, 'मी सुद्धा 15 वर्षांपासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देश आणि जगाशी जोडलेला आहे.'
PM Modi Addressed YouTubers : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये (YouTube Fanfest India 2023) युट्यूबर्सना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी यूट्यूबर्सना (YouTubers) आवाहन केलं आहे. पंतप्रधान मोदी यांनी यूट्यूब कंटेंट क्रिएटर्सना (YouTube Content Creators) स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, वोकल फॉर लोकल या अभियानांची माहिती जनसामान्यांमध्ये जागरुकता पसरवण्याच्या कामात हातभार लावण्याचं आवाहन केलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'मी सुद्धा 15 वर्षांपासून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देश आणि जगाशी जोडलेला आहे.'
पंतप्रधान मोदींच्या यूट्यूबर्ससोबत धमाल गप्पा
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी सुद्धा एक यूट्यूबर, माझ्याकडेही फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत. पंतप्रधानांनी 5,000 यूट्यूबर्सना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुमचा कंटेट लोकांवर कसा प्रभाव पाडत आहे, मी गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. आज आपल्याला कंटेट अधिक प्रभावी बनवण्याची आणि देशातील जनतेच्या जीवनात मोठा बदल घडवून आणण्याची संधी आहे. आपण एकत्रपणे मिळून लोकांना सक्षम बनवू शकतो.
मी सुद्धा एक यूट्यूबर...
युट्यूबर्संना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, ''माझे सर्व मित्र युट्यूबर्स... एक यूट्यूबर म्हणून तुमच्यासोबत या कार्यक्रमात सामील होता आल्यामुळे मी फार आनंदी आहे. मीही तुमच्या सर्वांप्रमाणेच आहे, मी काही वेगळा नाही. 15 वर्षांपासून मीही एका युट्यूब चॅनलद्वारे देश आणि जगासोबत जोडलेला आहे. माझ्याकडेही फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत. त्यांचा आकडाही फार मोठा आहे.''
पाहा व्हिडीओ : नक्की काय म्हणाले पंतप्रधान मोदी
VIDEO | PM Modi received a warm welcome as he virtually addressed the YouTube Fanfest India 2023 being held in Mumbai earlier today. pic.twitter.com/p7gi6LTAN0
— Press Trust of India (@PTI_News) September 27, 2023
पंतप्रधान म्हणाले, "जेव्हा मी देशाच्या सर्जनशील समुदायामध्ये असतो, तेव्हा मला काही विषय तुमच्यासमोर मांडावेसे वाटतात. हे विषय जनआंदोलनाशी संबंधित आहेत. देशातील जनतेची शक्ती हाच त्यांच्या यशाचा आधार आहे. यातील पहिला विषय स्वच्छता आहे. गेल्या 9 वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान सुरु आहे. यामध्ये सर्वांचं योगदान आहे. यूट्यूबर्सने 'क्लीलनलीनेस' (Cleanliness) ला 'कूल' (Cool) बनवलं आहे.
चॅनल सबस्क्राईब करण्याचं आवाहन
यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या संवादाचा शेवट युट्यूबर्सच्या स्टाईलमध्ये केला आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करण्याचं आवाहन केलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनेलचे प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा.
महत्वाच्या इतर बातम्या :