Pinarayi Vijayan : वंदे भारत ट्रेनच्या कार्यक्रमात विद्यार्थांना RSS गीत गायला लावलं, केरळच्या मुख्यमंत्र्यांची टीका
Pinarayi Vijayan On RSS : वंदे भारत ट्रेनच्या कार्यक्रमात देशभक्ती गीत म्हणून RSS गीत गायला लावणे म्हणजे स्वातंत्र्यलढ्याची थट्टा करण्यासारखं आहे अशी टीका केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली.

मुंबई : वंदे भारत ट्रेनच्या कार्यक्रमात (Vande Bharat) विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत गायला लावणे म्हणजे संविधानाच्या विरोधात कृती करण्यासारखे आहे, त्यातून धर्मनिरपेक्ष संकल्पनेला तडा जातोय असा आरोप केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन (Pinarayi Vijayan) यांनी केला. विजयन यांनी दक्षिण रेल्वेवर गंभीर आरोप करत तीव्र टीका केली. एर्नाकुलम–बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना RSS चे गीत गायला लावल्याचा आरोप त्यांनी केला.
Pinarayi Vijayan On RSS : सीएम विजयन काय म्हणाले?
विजयन म्हणाले की, वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांकडून RSS चे गीत गाऊन घेणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य असून याचा विरोध झाला पाहिजे. त्यांच्या मते, हे गीत धार्मिक तणाव आणि सांप्रदायिक राजकारणाला खतपाणी घालणारे आहे. त्यामुळे ते सरकारी कार्यक्रमात सामावून घेणे म्हणजे संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन आहे.
Pinarayi Vijayan Kerala CM News : सरकारी कार्यक्रमांच्या सेक्युलर प्रतिमेला धक्का
मुख्यमंत्री विजयन यांनी आरोप केला की, या कार्यक्रमात ‘कट्टर हिंदुत्व राजकारण’ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या म्हणण्यानुसार, अशा कृतींमुळे सरकारी कार्यक्रमांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा कमजोर होते आणि त्यामागे संकुचित राजकीय विचारसरणी काम करते. संघ परिवार देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक उपक्रम असलेल्या रेल्वेचाही वापर आपल्या कट्टर धार्मिक प्रचारासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दक्षिण रेल्वेने हे गीत सोशल मीडियावर ‘देशभक्ती गीत’ म्हणून शेअर केल्याचा उल्लेख करत विजयन म्हणाले की, हा प्रकार स्वातंत्र्य आंदोलनाची थट्टा करण्यासारखा आहे.
The @GMSRailway making students sing the RSS anthem at the flag-off of the Ernakulam–Bengaluru Vande Bharat Express is highly condemnable. Including the anthem of an organisation known for its communal ideology and hate mongering in an official event is a blatant violation of…
— Pinarayi Vijayan (@pinarayivijayan) November 8, 2025
Vande Bharat Controversy : राज्यसभा सदस्य जॉन ब्रिट्टस यांचीही टीका
राज्यसभा सदस्य जॉन ब्रिट्टस यांनी देखील रेल्वेवर टीका केली. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला ज्यात विद्यार्थी RSS चे गीत गाताना दिसत आहेत. त्यांनी लिहिले की एर्नाकुलम–बेंगळुरू वंदे भारत सेवेसाठी झालेल्या उद्घाटनात RSS गीताचा समावेश होणे म्हणजे रेल्वेच्या एका नव्या नीच पातळीचे उदाहरण आहे.
Pinarayi Vijayan News : विजयन यांची यापूर्वीची टीका
काही दिवसांपूर्वीही पिनराई विजयन यांनी RSS वर टीका केली होती. त्यांनी RSS ची तुलना इस्राएलमधील जियोनिस्ट गटांशी केली होती व दोघांची विचारसरणी अनेक मुद्द्यांवर सारखी असल्याचे म्हटले होते. तसेच RSS च्या शताब्दी वर्षासाठी केंद्राने स्मारक नाणे आणि पोस्टल तिकीट जारी करण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा दावा होता की हा निर्णय संविधानाचा अपमान करणारा आहे.
ही बातमी वाचा:






















