(Source: Poll of Polls)
RSS ही रजिस्टर्ड संस्था नाही, तरीही पैसे गोळा करतात, नाना पटोलेंचा हल्लाबोल, म्हणाले, पैशांचा हिशोब जनतेला दिलाचं पाहिजे
आरएसएस (RSS) ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसनं जनतेला दिलाचं पाहिजे. असे मत काँग्रसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले.
Nana Patole : आरएसएस (RSS) ही रजिस्टर्ड संस्था नसताना सुद्धा पैसे गोळा करत आहे. गोळा केलेल्या पैशाचा हिशोब आरएसएसनं जनतेला दिलाचं पाहिजे. शासनानं यात लक्ष घातलं पाहिजे, असे मत काँग्रसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केले. ही संस्था काय करते? त्या संस्थेचा मूळ उद्देश काय आहे? काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा त्या प्रकारचा अनेकदा प्रयत्न झाला. पण आता जनतेमध्ये त्या पद्धतीचे एक वातावरण निर्माण होत असेल तर, शासनानं त्यात लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. आरएसएसवर बंदी घालावी, या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकर अनुयायी रस्त्यावर उतरले यावर नाना पटोले बोलत होते.
जेव्हा एखाद वेळी समूह एकत्र येतात. त्यामुळे ते पैसे गोळा होतात. ती संस्था काय करते? त्या संस्थेचा मूळ उद्देश काय आहे? या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशनमध्ये असतात. यांचं कुठलेही रजिस्ट्रेशन झालं नसल्यामुळे हा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहेच. काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा त्या प्रकारचा अनेकदा प्रयत्न झाला. पण आता जनतेमध्ये त्या पद्धतीचा एक वातावरण मान होत असेल तर शासनाने त्यात लक्ष घातलं पाहिजे असे पटोले म्हणाले.
महाराष्ट्र महिलांसाठी आता सुरक्षित राज्य नाही
भाजपच्या केंद्र सरकारने सादर केलेल्या नॅशनल क्राइम ब्युरो च्या अहवालात धक्कादायक नोंद झाली आहे. नाना पटोले यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात महिलांचा जो सन्मान होत होता. तो आता महायुतीच्या सरकारमध्ये होत नाही. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यांनीच नॅशनल क्राइम ब्युरो चा सादर केलेल्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रात महिलांवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याचं नमूद आहे. महाराष्ट्र आता महिलांसाठी असुरक्षित राज्य झाल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. सातारा येथील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आणि आत्महत्या पूर्वी तिने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहून ठेवली. त्यात पोलिसांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला यावर नाना पटोले बोलत होते.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील महिला अत्याचाराच्या घटना समोर येतात आहेत. कर्मचारी असो की सामान्य महिला त्यांच्यावर सातत्याने अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नॅशनल क्राइम ब्युरोचा जो आता रिपोर्ट आलेला आहे, त्यात महाराष्ट्र महिलांसाठी आता असुरक्षित आहे. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे पटोले म्हणाले.



















