एक्स्प्लोर
दहशतवादी संघटनेत प्रवेश केलेल्या पीएचडी स्कॉलरचा खात्मा
मनन बशीर वाणी या काश्मिरच्या पीएचडी स्कॉलरने 'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता.
श्रीनगर : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील पीएचडी शिक्षण अर्धवट सोडून दहशतवादाच्या वाटेवर गेलेल्या तरुणाचा खात्मा करण्यात आला आहे. मनन बशीर वाणी या काश्मिरी तरुणाने 'हिजबुल मुजाहिद्दीन' या दहशतवादी संघटनेत प्रवेश केला होता. कूपवाड्यात झालेल्या चकमकीत पोलिसांनी दहशतवादी मनन वाणीला कंठस्नान घातलं.
कूपवाडा जिल्ह्यातील हंडवारामध्ये एसओजी आणि सैन्य दलातील 30 राष्ट्रीय रायफल गटाच्या जवानांची गुरुवारी धुमश्चक्री झाली. यामध्ये मनन बशीर वाणी आणि आशिक हुसैन झरगर या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात पीएचडी स्कॉलर असलेला 26 वर्षीय मनन बशीर वाणी एका उच्चशिक्षित कुटुंबात जन्माला आला. त्याचे वडील लेक्चरर आहेत, तर भाऊ अभियंता आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात मननने विद्यापीठातून सुट्टी घेतली होती, मात्र घरी जाण्याऐवजी त्याने 'हिजबुल मुजाहिद्दीन'मध्ये प्रवेश केला.
दहशतवादी संघटनेत प्रवेश करणारा तो पहिलाच पीएचडीचं शिक्षण घेणारा काश्मिरी विद्यार्थी होता. मननने हातात रायफल घेतलेला एक फोटो पाच जानेवारीला सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती मिळाली. त्यावेळी, हादरलेल्या कुटुंबाने मननला घरी परतण्याचं आवाहन केलं होतं.
मननच्या मृत्यूनंतर जम्मू आणि काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट केलं आहे. एका पीएचडी स्कॉलरने जीवनाऐवजी मृत्यूची निवड केली. दररोज तरुण सुशिक्षित विद्यार्थी गमवावे लागणं, हे आमचं नुकसान असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
Today a PhD scholar chose death over life & was killed in an encounter. His death is entirely our loss as we are losing young educated boys everyday. 1/2
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 11, 2018
It is high time that all the political parties in the country realise the gravity of this situation and try to facilitate a solution through dialogue with all the stake holders including Pakistan to end this bloodshed. 2/2
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement