एक्स्प्लोर
पेट्रोल-डिझेलच्या दरात घट, नवे दर मध्यरात्रीपासून लागू
नवी दिल्ली : महागाईला कंटाळलेल्या सर्वसामन्य नागरिकांसाठी थोडा दिलासा आहे. सलग तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोलचे दर 1.42 रुपये, तर डिझेलचे दर 2 रुपये प्रतिलीटर कमी करण्यात आले आहेत. नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.
देशातील तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीचं समीक्षण करतात. त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रूडच्या दरांवरुन देशांतर्गत तेल किंमतींमध्ये बदल केला जातो.
तिसऱ्यांदा कपात
याआधी 15 जुलैला पेट्रोल प्रतिलीटर 2.25 रुपये आणि डिझेल 42 पैशांनी स्वस्त झाला होता. त्याहीआधी 30 जूनला पेट्रोलच्या दरात 89 पैसे प्रतिलीटर आणि डिझेलच्या दरात 49 पैसे कपात करण्यात आली होती. त्यानंतर आज पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement