एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडले; देशातही पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार?

Petrol Diesel Rate Today 7th June 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Rate Today 7th June 2022 : भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel)  नवे दर जाहीर केले आहेत. आज सलग सोळाव्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामुळे आधीपासूनच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना आज काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलचे आजचे नवे दर जाणून घ्या. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. 

कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ

WTI Crude बद्दल बोलायचं झालं तर आज 0.62 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर त्याची किंमत 119 डॉलर  प्रति बॅरलवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूडच्या किमतींबद्दल बोलायचं झालं तर, ते देखील 0.56 टक्क्यांनी वाढलं आहे. 

यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट करत सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला होता. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील 8 रुपये आणि डिझेलवरील 6 रुपयांचं उत्पादन शुल्क हटवलं होतं. त्यानंतर देशात पेट्रोल 9.50 रुपये आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचा दर काय? 

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लीटर आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात स्वस्त, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळतंय कुठे? 

देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech : दूरदृष्टीची झलक, नेतेपदी निवडीनंतर देवाभाऊचं पहिलं भाषण UNCUTDevendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणाDevendra Fadnavis Vidhimandal Gatnete | विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसच!BJP Core Committee Meeting : आमचं ठरलं ! कोअर कमिटी बैठकीनंतर अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
देवेंद्रजींचा मुख्यमंत्रीपदाचा अनुभव महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा, पंकजाताई म्हणाल्या, 'आता आमचा मूड चांगलाय'
Maharashtra CM : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? गेल्या पाच महिन्यात काय काय घडलं?
Devenra Fadnavis : क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
क्यों पड़े थे चक्कर, में कोई नहीं था टक्कर में, देवेंद्र फडणवीसांची निवड होताच घोषणाबाजी 
Maharashtra BJP MLA List 2024 : भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
भाजप आमदारांची संपूर्ण यादी, सर्व 132 आमदारांची नावे
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
आज एक घाव दोन, तुकडे! दिल्लीतील निरीक्षकांच्या उपस्थितीत भाजपात बैठकसत्र; मुख्यमंत्री, मंत्रिपदांवर महत्त्वाचे निर्णय?
Breaking News : मोठी बातमी! अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
VIDEO: अमृतसरमधील सुवर्ण मंदिराबाहेर गोळीबार; माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना जीवे मारण्याचा प्रयत्न
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
मोठी बातमी! MBBS द्वितीय वर्षाचा पेपर फुटला, थेट सोशल मीडियावर व्हायरल, आता फेर परीक्षेची नामुष्की! 
अंमली पदार्थांची विक्री करताना सापडले, मुंबई-पुण्यात गुन्हे शाखेने उच्चशिक्षित तरुणांना केली अटक, सराईत ड्रग डिलरचाही समावेश
नशेच्या गोळ्या, अंमली पदार्थांची तस्करी, मुंबईपुण्यात गुन्हे शाखेची कारवाई, उच्चशिक्षित तरुणांना अटक
Embed widget