![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Petrol Diesel Rate : देशातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग
Petrol Diesel Rate Today 5th June 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून आज देशातील दर स्थिर आहेत.
![Petrol Diesel Rate : देशातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग Petrol Diesel Rate Today 5th June 2022 Sunday know today new fuel prices according to iocl marathi news Petrol Diesel Rate : देशातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/22/b5d99a5d7873b867982cdbe9b3714bb2_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Rate Today 5th June 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel) आजही कोणताच बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी 21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. केंद्र सरकारनं उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं.
आज WTI क्रूडचा दर 2 डॉलर किंवा 1.71 टक्क्यांनी वाढून 118.9 डॉलर प्रति बॅरल राहिला आहे. अशातच, ब्रेंट क्रूडच्या किमती 2.11 डॉलर किंवा 1.79 टक्क्यांच्या उसळीसह प्रति बॅरल 119.8 डॉलरवर राहिल्या आहेत.
सर्वात स्वस्त, सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळतंय कुठे?
देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 79.74 प्रति लिटर आहे. तर, आजही देशातील सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये 114.38 रुपये प्रति लिटर आणि आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये 100.30 रुपये प्रति लिटर आहे.
देशातील महानगरांतील किमती काय?
आज मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये प्रति लीटर तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर मिळत आहे. कोलकात्यात पेट्रोलची किंमत 106.03 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत 92.76 रुपये प्रति लिटर आहे. तसेच चेन्नईमध्येही पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?
महाराष्ट्रातील मुंबई शहरात गुरुवारी पेट्रोलचा दर 111.35 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 97.28 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, बृहन्मुंबईमध्ये, पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.53 रुपये आणि डिझेलचा दर 97.45 रुपये प्रति लिटर आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.93 रुपये तर डिझेलचा दर 96.38 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.25 रुपये तर डिझेलचा दर 95.73 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.41 रुपये तर डिझेलचा दर 95.92 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.02 रुपये तर डिझेलचा दर 95.54 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)