एक्स्प्लोर

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती जारी; मुंबईत एक लिटर पेट्रोलचे दर काय?

Petrol, Diesel Price Today : इंधन कंपन्यांनी ग्राहकांना मोठा दिलासा आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर...

Petrol-Diesel Price 13 December Updates : देशभरात गेल्या चाळीस दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले असून आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारनं 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.08 टक्क्यांनी वाढून $74.48 वर पोहोचली. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढून $71.20 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत  94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.  

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. 

दरम्यान, पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क सध्या 27. 90 रुपये इतकं आहे. तर, डिझेलवर 21.80 रुपये आहे. राज्यात केवळ मूळ उत्पादन शुल्कातून वाटा मिळण्याचा अधिकार आहे. कर आकारणीच्या एकूण बाबींपैकी पेट्रोलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.40 रुपये प्रति लीटर आहे. याचबरोबर विशेष अतिरिक्त उत्पादक शुल्कात 11 रुपये आणि रस्ता तसेच पायभूत सुविधेवरील उपकर 13 रुपये प्रति लीटर आकारला जातो. कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर 2.50 रुपये आकारला जातो. त्याचप्रमाणे, डिझेलवरील मूळ उत्पादन शुल्क 1.80 रुपये प्रति लीटर आहे. विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर म्हणून प्रति लिटर 8 रुपये आकारला जातो. तर, 4 रुपये प्रति लिटर कृषी पायाभूत सुविधा आणि विकास उपकर देखील आकारला जातो.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री ExclusiveWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget