एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol-Diesel Price : आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, गाडीची टाकी फुल्ल करण्यासाठी किती रुपये मोजाल?

Petrol-Diesel Price Today 9th July 2022 : भारतीय तेल कंपन्यांकडून देशाती पेट्रोल-डिझेलच्या किमती जाहीर, जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol-Diesel Price Today 9th July 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil)  किमतींमध्ये सध्या अनेक चढ-उतार सुरु आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर पोहोचली आहे. अशातच पेट्रोल-डिझेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरांनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

भारतीय तेल कंपन्यांनी आज, शनिवारी जारी केलेल्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. देशातील पेट्रोल (Petrol) -डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. जवळपास दीड महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत आहेत. 

येत्या 5 वर्षांत पेट्रोल संपणार : नितीन गडकरी 

देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, इथेनॉलवर घेतलेल्या निर्णयामुळे देशाचे वार्षिक 20,000 कोटी रुपये वाचले. आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी सर्व वाहनं ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर धावतील. त्यांच्या या विधानांचा संबंध वाहनांमुळे होणारं प्रदूषण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या भविष्याशी जोडला जात आहे.

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय? 

आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 110.88 रुपये तर डिझेलचा दर 95.37 रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.74 रुपये तर डिझेलचा दर 96.20 रुपये प्रति लिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.08 रुपये तर डिझेलचा दर 95.59 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.34 रुपये तर डिझेलचा दर 95.84 रुपये प्रति लिटर आहे. 

देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलचे दर काय?

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 97.28 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी असलेल्या दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि 1 लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये तर, डिझेलचा दर 94.24, कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे. 

मुख्यमंत्र्यांकडून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन 

21 मे रोजी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची घोषणा केली होती. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं होतं. त्यानंतर इंधनाचे दर स्थिर आहेत. ज्यावेळी केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. केंद्रापाठोपाठ अनेक राज्यांनीही व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा होता. पण महाराष्ट्रात मात्र कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता. तत्कालीन ठाकरे सरकारवर त्यावेळी विरोधी पक्षांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. अशातच आता महाराष्ट्रात सत्तापालट झाला आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभेत बोलताना पेट्रोल-डिझेलच्या दरांत कपात करणार असल्याची घोषणा केली आहे. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. या निर्णयाची घोषणा कधी होणार? आणि गगनाला भिडलेल्या किमतींमध्ये दिलासा कधी मिळणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut Full PC : शिंदेंच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलंय; ते काय करतील सांगता येत नाहीSanjay Shirsat PC | महायुतीची मीटिंग सोडून शिंदे गावी, संजय शिरसाटांनी दिली महत्वाची माहितीABP Majha Headlines :  11 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, 'या' गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान
Shani Amavasya : एकनाथ शिंदेंनी ऐन अमावस्येला गावात पाऊल ठेवलं; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
ऐन अमावस्येला नाराज एकनाथ शिंदे गावाला; तिकडे अशी कोणती देवी? संजय राऊत म्हणतात...
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
काँग्रेसचा विधानसभेत लाजीरवाणा पराभव, मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसमोरच नेत्यांना खडसावलं
Ranbir Kapoor : पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
पाकिस्तानी माहीरा, दीपिका ते श्रुती हसन! आलिया भट्टला भेटण्यापूर्वी रणबीर कपूरची 'या' 11 अभिनेत्रींसोबत अफेअरची मालिकाच झाली
Bollywood Interfaith Marriages : रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
रितेश देशमुख, धर्मेंद्र ते सुनील शेट्टी! बॉलीवूडमधील 13 आंतरधर्मीय विवाह माहीत आहेत का?
Sanjay Raut on Eknath Shinde : शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
शिंदेंचा चेहरा पडलाय, डोळ्यात चमक नाही, नाराज होऊन अमावस्येच्या मुहूर्तावर गावाला; संजय राऊतांचा बोचरा वार
Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
एकनाथ शिंदे अचानक दरे गावात जाण्याचं कारण काय? आदित्य ठाकरे म्हणाले, आकाशात चंद्र दिसतोय का?
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Embed widget