एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Petrol-Diesel Price : दिलासादायक 97 दिवस! पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price Today 9th February 2022 : महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?

Petrol-Diesel Price Today 9th February 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरिही देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, देशातील पेट्रोल-डिझेलचे दर सलग 97 दिवसांपासून स्थिर आहेत. 

आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइल (Crude Oil) च्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. ब्रेंट क्रूड 93 डॉलर प्रति बॅरल पार पोहोचलं आहे. तरिदेखील देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. देशात 4 नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारनं पेट्रोलच्या उत्पादन शुल्कावर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपये प्रति लिटर घट केली होती. त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल 100 रुपयांच्या खाली आलं. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, राज्यातील अनेक शहरांत पेट्रोलच्या किमती शंभरी पार पोहोचल्या आहेत. 

महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आजचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पेट्रोलचे दर अद्यापही शंभरीपार आहेत. जाणून घेऊयात मुंबई, पुण्यापासून नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत...

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती : 

प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर  93.90 रुपये प्रति लिटर

देशातील महत्त्वाच्या शहरांतील किमती काय? 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

देशातील महानगरांतील आजचे दर :
देशातील प्रमुख शहरं  पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर 
मुंबई 109.98  94.14
दिल्ली 95.41  86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79
पाटणा 105.92 91.09

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला  कसा बनला सत्ताकेंद्र?भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाचSpecial Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Heeramandi 2: संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
संजय लीला भन्साळींचा 'हिरामंडी 2' येणार? मनिषा कोईरालानं थेट शुटिंगची तारीखच सांगितली
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
धक्कादायक! अंधेरीत 25 वर्षीय पायलट युवतीने संपवलं जीवन; पोलिसांनी बॉयफ्रेंडला उचललं
Embed widget