एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी घट; देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर, कपात होणार?

Petrol-Diesel Price Today : महाराष्ट्र, मेघालय वगळता देशभरात तब्बल 106 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर. तुमच्या शहरांतील दर काय?

Petrol-Diesel Price Today 7th September : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्यानं कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये (Petrol-Diesel Price) कोणताही बदल झालेला नाही. 

केंद्र सरकारनं यापूर्वी 21 मे रोजी पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. यानंतर देशभरात पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त झालं आहे. तेव्हापासून देशातील मेघालय आणि महाराष्ट्र ही दोन राज्य वगळता इतर राज्यांमध्ये दर स्थिर आहेत. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर नवनिर्वाचित शिंदे-फडणवीस सरकारनं 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. तेव्हापासून राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. 

गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये घट 

1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांत कपात केली. कच्च्या तेलाच्या किमतींत झालेल्या घसरणीमुळे तेल कंपन्या पेट्रोल आणि एलपीजीच्या किमतीची भरपाई करण्याच्या स्थितीत आहेत. सुमारे साडेतीन महिन्यांपूर्वी 22 मे रोजी केंद्रानं पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करून मोठा दिलासा दिला होता. गुरुवारी सकाळी WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल 86.73 डॉलरवर पोहोचली आहे. तसेच, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 92.70 डॉलरवर पोहोचलं आहे.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या अधिकृत वेबसाइट iocl.com नं जारी केलेल्या दरांनुसार, आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट केलेली नाही. नव्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनुसार, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

महाराष्ट्रातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर पेट्रोलच्या किमती  डिझेलच्या किमती
मुंबई 106.25 94.22
पुणे  105 92
नागपूर  106.03 92.58
नाशिक 106.74 93.23
हिंगोली 107.29 93.80
परभणी 108.92 95.30
धुळे  106.05 92.58 
नांदेड  108.24 94.71
रायगड  105.96 92.47
अकोला  106.05 92.55
वर्धा  106.56 93.10
नंदुरबार  106.99 93.45
वाशिम 106. 37 93.37
चंद्रपूर 106.14 92.70
सांगली  105.96 92.54
जालना 107.76  94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 09 PM एबीपी माझा हेडलाईन्स 09 PM 06 July 2024 Marathi NewsPalkhi Ringan 2024 | संत सोपानकाका पालखीचे सोमेश्वर येथे यंदाचे पहिले रिंगण पार पडलेSunetra Pawar Wari | सुनेत्रा पवारांनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत!Supriya Sule Wari | खासदार सुप्रिया सुळेंनी केलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत स्वागत!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुकंलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ऐकावं ते नवलंच! साप चावला म्हणून रागाच्या भरात पठ्ठ्या सापालाच चावला, एक-दोन नव्हे तीन वेळा चावा; पुढे जे घडलं...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जुलै 2024 | शनिवार
Embed widget