Petrol Diesel Price : तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today : इंधन दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत असताना इंधन कंपन्यांनी आज नवीन दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर अस्थिर आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर होत आहे. मागील काही दिवसात कच्च्या तेलाच्या दराचे उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे भारतातील इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कायम ठेवले आहेत. सोमवारनंतर देशात इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी, 7 मार्च रोजी विधानसभा निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
मागील जवळपास चार महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. देशभरात सुरू असलेल्या निवडणुकांमुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधन दरवाढीचा निर्णय लांबणीवर गेला असल्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र, सोमवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळीच दरवाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यात इंधन दर काय?
महाराष्ट्रात एक लिटर पेट्रोलचे दर 100 रुपयांहून अधिक आहेत. भारतीय पेट्रोलियम वितरण कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (IOCL) आजचे नवे दर जारी केले आहेत. जाणून घ्या राज्यातील प्रमुख शहरातील इंधन दर
प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर 94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर 94.28 रुपये प्रति लिटर
पुणे 109.52 रुपये प्रति लिटर 92.31 रुपये प्रति लिटर
नाशिक 110.40 रुपये प्रति लिटर 93.16 रुपये प्रति लिटर
नागपूर 95.27 रुपये प्रति लिटर 86.51 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 110.09 रुपये प्रति लिटर 92.89 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 109.55 रुपये प्रति लिटर 92.35 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.55 रुपये प्रति लिटर 95.74 रुपये प्रति लिटर
देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).